लोकराजा शिवविचारमंच चे काम आदर्शवत ; प्राध्या.सडोलकर

 पोलीस प्रवाह न्युज

कोल्हापुर प्रतिनिधी ; विनायक सातुसे

संपर्क ; 9766498212



"खेबवडे येथे गडकिल्ले स्पर्धा उत्साहात संपन्न"

खेबवडे ता.करवीर येथे दिपावली निमित्त गड किल्ले स्पर्धा लोकराजा शिवविचारमंचच्या वतीने आयोजित केली गेली.सदर उपक्रम पाच वर्षांपासून सुरू असुन स्पर्धक संख्या वाढत असुन नवनिर्मितीचा ध्यास, छत्रपती शिवाजी महाराज,संभाजी महाराज यांच्या विचार आचारांचा प्रसार ह्यातुन होत असुन लोकराजा शिवविचार मंच चे कार्य आदर्शवत असुन असे उपक्रम गावागावात साजरे व्हावेत असे विठ्ठल सडोलकर किल्ले स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

या स्पर्धेत १७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.शिवनेरी, पन्हाळा,रायगड,विजयदुर्ग,जंजिरा , नळदुर्ग अश्या असंख्य गडकिल्ल्यांच्या प्रतिकृतींनी अवघं खेबवडे शिवमय झाले होते.किल्ले बांधणीसाठी अनेक दिवस अभ्यास करून त्यातील सर्व बारकावे लक्षात घेऊन किल्ले साकारले असल्याने स्थानिक लोकांपासून ते पंचक्रोशीतील शिवप्रेमींनी गड किल्ल्यानां भेट दिली.



या स्पर्धेत जाणता राजा बालमित्र मंडळ यांनी प्रथम क्रमांक मिळवला.शिवप्रेमी बालमित्र मंडळाचा द्वितीय,जय हनुमान बालमित्र मंडळाचा तृतीय, नरवीर शिवा काशीद मंडळाने चतृर्थ क्रमांक पटकावला.

या स्पर्धेसाठी श्री सडोलकर,प्रताप लाड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं.तसेच या स्पर्धेसाठी निवासदादा पाटील,डी वाय पाटील ( बापू) श्री चंद्रकांत आनंदा जाधव,विक्रम विजय पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

या स्पर्धेची परंपरा ही अशीच अखंडित सुरू ठेवण्याची इच्छा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या