पोलीस प्रवाह टीमला सर्वोतोपरी सहकार्य असेल - पो.नि.संजय गोरले

 

🚔पोलीस प्रवाह न्युज🚔


कोल्हापुर प्रतिनिधी ; विनायक सातुसे

संपर्क  9766498212📞

*"कागल पोलीस ठाण्यात खाकी पर्व पुस्तक प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न"*



कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा श्री *संजय गोरले सर* यांच्या शुभहस्ते अल्पावधीतच लोकप्रिय झालेले *खाकी पर्व* समाज्यातील दुवा भाग २ पुस्तक प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

पोलीस प्रवाह न्युज खाकी वर्दीच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी हक्कांच व्यासपीठ म्हणुन संपुर्ण राज्यभर काम करत आहे. "खाकी पर्व" हे पुस्तक खाकी वर्दीतील उत्तुंग यश मिळवलेल्या अधिकाऱ्यांची यशोगाथा त्यांची जिद्द,प्रवास आणि विविध अनुभव प्रकाशित करत आहे.

कागल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोरले यांनी पोलीस प्रवाह टीमच्या कार्याची दखल घेत बहुमुल्य वेळ दिला. त्यांच्याशी संवाद साधताना खाकी वर्दीतील एक निगर्वी आणि सेवाभावी अधिकारी कागल पोलीस ठाण्याला लाभल्याचे प्रकर्षाने जाणवत होते.

पोलीस निरीक्षक संजय गोरले यांनी पोलीस प्रवाहच्या टीमच्या कार्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या व चांगल्या कामासाठी नेहमीच सहकार्य राहील असा विश्वास देखील त्यांनी दिला.

ह्यावेळी कागक पोलीस ठाण्यातील राम डावरे, बंजारे,राजीव सावंत,त्याचबरोबर महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस प्रवाह न्युजचे जिल्हा प्रमुख विवेक पोतदार,जिल्हा पत्रकार प्रतिनिधी विनायक सातुसे,सौरभ बोभाटे,नितेश पोतदार,गौरव बोभाटे इ. उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या