प्रतिनिधी - करमाळा
गेली 8 वर्षापासून यशकल्यानी ग्रामीण सेवाभावी संस्थे चे कार्य अतिशय उत्कृष्ट असून ,शाळांना संगणक पुरवणे पासून विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना व्यसपीठ उपलब्द करून देणे त्यांचा सन्मान करणे ,शालेय साहित्य वाटप ,ते अनेक सामाजिक कार्यात प्रत्येक्ष सहभाग ,कोरोना काळात मदतीचा हात ,देणारे सामाजिक बांधिलकी जपणारे एक आदर्श व्यक्तिमत्व हे श्री गणेशभाऊ करे पाटील यांचे रूपाने करमाळा शहराला लाभले आहे ,यांचे सामाजिक कार्यात नेहमीच मोलाचा सहभाग पाहता त्यांना पुणे येथील पोलीस प्रवाह न्यूज तर्फे यंदा दिला जाणारा 2021 कर्तव्यदक्ष हा पुरस्कार मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला,पुरस्कार प्रदान करताना पोलीस प्रवाह पुणे चे संपादक श्री नवनाथ कापले सर ,पुणे येथील पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर ,राष्ट्रवादी काँग्रेस चे युवा नेते श्री अभिषेक जी आव्हाड ,यु टुयब स्टार श्री सागर खरात ,राष्ट्रीय पारितोषिक विजेते श्री निखिल सोरटे,व इतर मान्यवर ,
याप्रसंगी पोलीस प्रवाह न्यूज च्या महिती पुस्तकांचे मान्यवरांना वाटप करण्यात आले.

0 टिप्पण्या