( कागल तालुक्यातील मुरगूड नजीकच्या शिंदेवाडीत तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड ; १८ जण ताब्यात ; दीड लाखाच्या वर रोख रकमेसह मुद्देमाल जप्त )
कागल प्रतिनिधी/ओंकार पोतदार
शिंदेवाडी (ता .कागल ) येथील दत्तात्रय पुंडलिक शिंदे यांचे जनावरांचे गोठयात खेळल्या जात असणाऱ्या तीन पानी पत्याचा जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली असून रोख 17250/- रुपयासह एकूण 1,53,050/-रू चा मुदेमाल जप्त केला आहे. तर अठरा जणांच्या वर गुन्हा नोंद केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे. मंगळवार दि. २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ही धाड टाकली आहे.
.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिंदेवाडी येथे दत्तात्रय पुंडलिक शिंदे यांचे जनावरांचे गोठयात 1 ) रणजीत रामचंद्र कलकुटकी व व.38 रा. शाहूनगर, शिंदेवाडी ता.कागल – 2) उत्तम बाळासो रावण वय 22 रा. मुरगुड ता. कागल 3 ) पांडुरंग दत्तात्रय मेतकेकर वय .52 रा. मुरगुड ता. कागल 4 ) तानाजी आनंदा भोसले वय.37 रा. पिराचीवाडी ता. कागल 5 ) रणजीत मारुती पाटील वय.34 रा. केंबळी ता. कागल 6) दिलीप परशुराम वडर वय.38 रा. व्हनाळी ता. कागल 7 ) राम मधुकर मोरबाळे वय. 26 रा. मुरगुड ता. कागल 8 ) अनिकेत शशिकांत सोनुले वय 26 रा मुरगुड ता कागल 9) आनंदा रामचंद्र कणसे वय 40 रा शाहुनगर, शिंदेवाडी ता कागल 10 ) जयसिंग दिनकर आरडे वय 36 रा. दौलतवाडी ता कागल 11 ) धनाजी हरी पाटील वय 52 रा मुदाळ ता. भुदरगड 12 ) समशेद अजित ताशिलदार वय 57 रा .मुरगुड ता कागल 13 ) सुशांत सखाराम टिपुगडे वय 30 रा. मुरगुड ता कागल 14 ) रामदास आनंदा भोसले वय 40 रा .पिराचीवाडी ता कागल 15 ) प्रविण राजेंद्र शिंदे वय 32 रा .मुरगुड ता कागल 16 ) अक्षय गणेश भोइ वय 24 रा. मुरगुड ता कागल 17 ) कृष्णात गणपती वाइंगडे वय 39 रा. मुरगुड ता .कागल हे सर्वजण तीन पानी पत्याचा जुगार खेळत असताना पोलिसांना आढळून आले.
.पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये रोख रक्कम 17250/- रु , मोबाइल नग 9 त्याची एकुण किंमत 18800/- व मोटरसायकली एकुण 6 त्याची एकुण किंमत 117000 /- रु आणि वेगवेगळी जुगाराची पत्याची पाने असा एकुण 1,53,050/-रू असे मुदेमालासह मिळुन आले. या घटनेची नोंद मुरगूड पोलिस स्थानकात झाली आहे. पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर आर ए वाघमारे व त्यांचे सहकारी करत आहेत

0 टिप्पण्या