सांऊड सिस्टीममुक्त गणेशोत्सवाने कोरोना मुक्तीला बळ : सपोनि बडवे

 

सांऊड सिस्टीममुक्त गणेशोत्सवाने कोरोना मुक्तीला बळ : सपोनि बडवे

भडगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केलेल्या आवाहनाला सर्वांनी चांगला प्रतिसाद देऊन यंदाही कोरोनाच्या संकटात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव झाल्याने कोरोनामुक्तीला बळ मिळत आहे, असे प्रतिपादन मुरगूड पोलिस ठाण्याचे स. पो. नि. विकास बडवे यांनी केले. चौंडाळ (ता. कागल) येथे सलग नऊ वर्षे 'एक गाव, एक गणपती' उपक्रम सुरू ठेवल्याबद्दल मुरगूड पोलिस ठाण्याकडून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपप्रसंगी ते बोलत होते. बडवे म्हणाले, मुरगूड पोलिस ठाणे अंतर्गत ५६ पैकी ११ गावांनी 'एक गाव एक गणपती' संकल्पना राबवली. तर ३१० सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला. सर्व मंडळांनी घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन केले. यावेळी सरपंच मारुती पाटील, मुख्याध्यापक चंद्रकांत चौगले, पोलिस पाटील राजेंद्र रेपे, स्वप्निल मोरे, भिवाजी रेपे, अभय गुरव, विजय रेपे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या