मुरगूडच्या सानिका स्पोर्टच्या आणि मुरगूड शहर नागरिकांच्या वतीने पीएसआय किशोरकुमार खाडे यांचा सत्कार.

 

मुरगूड प्रतिनीधी: ओंकार पोतदार

 मुरगूड पोलिस स्टेशनचे पीएसआय किशोर कुमार खाडे यांच्या बदलीनिमित्त नगर पालिका व सानिका स्पोर्टसच्या वतीने नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सत्कार समारंभ झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेखान जमादार होते. उत्पादन सेवा शुल्क विभागाचे पीएसआय पांडुरंग कुडवे यांच्या हस्ते खाडे यांचा सत्कार करण्यात आला. पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी खाडे यांना सन्मानित केले. खाडे यांची बदली कुरुंदवाड येथे झाली आहे.

 नगराध्यक्ष राजेखान-जमादार म्हणाले, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोलिसांबद्दलच्या बदनामकारक घटना घडत असताना पीएसआय खाडे यांनी पोलीस प्रतिमा उजळ करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. सहायक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी खाडे यांच्या कार्याचे कौतुक करून कायदा व सुव्यवस्थेबरोबर पोलीस खात्याविषयी सामान्य माणसामध्ये आस्था व जिव्हाळा निर्माण करण्यासाठी जनतेत राहून अधिकाऱ्यांना कार्यरत रहावे लागेल असे सांगितले. 

सत्काराला उत्तर देताना किशोर कुमार खाडे म्हणाले, लोकांमध्ये मिळून-मिसळून राहिल्यास समाजातील अनेक प्रश्न समजून येतात. सहवासामुळे समाजामध्ये आपुलकी निर्माण होते. लोकांना भूमिका पटवून दिली तर लोक समजून घेतात. मुरगूडकरांमध्ये सजगतेबरोबर कृतज्ञ वृत्ती आहे.

               यावेळी माजी उपनगराध्यक्ष बजरंग सोनुर्ले, पीएसआय कुमार ढेरे, नगरसेवक रविराज परीट, प्रकाश पोतदार, सचिन मेंडके, दत्ता मंडलिक, विनायक मुसळे, सागर सापळे, नंदकिशोर खराडे, पृथ्वीराज शिंदे, स्वप्निल मोरे , निशांत जाधव, जगन्नाथ चितळे, विकी बोरगावे, किशोर पोतदार, अविनाश बाबर, नंदू चौगुले, प्रशांत शहा यांच्यासह नागरिक उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्षा सौ रंजना मंडलिक, संतोष वंडकर, अनिल पाटील, विकी साळोखे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत सुशांत मांगोरे यांनी केले. प्रास्ताविकात दगडू शेणवी यांनी सानिका स्पोर्टसच्या विधायक विविध उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन अमर कांबळे यांनी केले तर आभार विनायक मुसळे यानीं मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या