पोलिस अधिकाऱ्याच्या अर्धांगिनीने घडविले प्रामाणिकपणाचे दर्शन

 

नाशिक शहरात दिवसेंदिवस महिलांचे मंगळसूत्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना एकदा गेलेलं मंगळसूत्र पुन्हा त्या महिलेला मिळणे अत्यंत जिकरीचे होऊन बसते एखाद्याची काही वस्तू हरवल्यास एकतर सापडत नाही आणि जर कोणाला सापडली तर त्याने परत देणे म्हणजे देव पावल्याची अथवा माणसाच्या रूपात देव भेटल्याची भावना ह्या कलियुगात येते


अनेक पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन अधून मधून होत असते.मात्र त्यांचे कुटुंबीय कधी प्रकाश झोतात येत नाहीत. एखाद्या पोलिस अधिकाऱ्याची त्याच्या चांगल्या कामगिरी वर कायम प्रसारमाध्यमातून वाह वाह होत असते.परंतु त्यांच्या पाठीशी सावली म्हणून उभ्या असणाऱ्या अर्धांगिनी यांची कोणी कधी दखल घेत नाही 

या सर्वांना फाटा देणारी एक घटना नाशिक शहरात घडल्याने सर्वत्र या प्रामाणिक पोलिस अधिकाऱ्याच्या अर्धांगिनीचे कौतुक होत आहे

शिर्डी शहर वाहतूक शाखेचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक नारायण न्याहळदे यांच्या पत्नी कल्पना नारायण न्याहळदे ह्या 22 सप्टेंबर रोजी भाजीपाला घेण्यास गेल्या असता त्यांना एक सोन्याचे मंगळसूत्र चैन खाली पडलेली दिसून आली.त्यांनी लागलीच आपले पोलिस अधिकारी असलेले पती नारायण न्याहळदे यांना फोन द्वारे याबाबत सांगितले. त्यांनी गंगापूर पोलिस स्टेशन येथे जाऊन तेथे जमा करण्याचे सुचविले सौ.कल्पना  न्याहळदे यांनी गंगापूर पोलिस स्टेशन येथे जात सदर सोन्याचे मंगळसूत्र वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांच्याकडे सुपूर्त केले. यावेळी गंगापूर पोलिस स्टेशन तर्फे त्यांचा पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.


एक सुज्ञ भारतीय नारी आणि एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्याची पत्नी म्हणून आज सौ. कल्पना नारायण न्याहळदे यांनी समाजासमोर एक नवा आदर्श घालून दिल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या