*शेतकरी व कामगार विरोधी कायदा रद्द कराव्यात यासाठी कागलमध्ये सर्वपक्षीय निदर्शने*
कागल प्रतिनिधी/ओंकार पोतदार
कागल देशभर पुकारण्यात आलेल्या आजच्या भारत बंदमध्ये कागल शहरात केवळ निदर्शने करण्यात आली. सोमवार आठवडी बाजार असल्याने हा बंद टाळून निदर्शने करण्याचा निर्णय घेतला असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ झालेल्या निदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवराज्य मंच यांचे कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणा देण्यात आल्या. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, शिवसेनेचे चंद्रकात गवळी, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी' कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर, शिवराज्य मंचचे अध्यक्ष इंद्रजित घाटगे, सचिन घोरपडे, प्रवीण काळबर, संजय हेगडे, नितीन दिंडे संजय चितारी, आनंदा पसारे, कर्मचारी संघटनेचे सुरेश शिंदे आदी प्रमुख सहभागी होते.
*मुरगूड शहरात बंदला नागरिकांचा प्रतिसाद*
केंद्राच्या कृषी विरोधी धोरणांचा निषेध करत येथील विविध परिवर्तनवादी, पुरोगामी पक्ष व संघटनांनी भारत बंदला पाठिंबा व्यक्त केला. समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने नागरिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हुतात्मा तुकाराम भारमल चौकात केंद्राच्या अन्यायी कृषी कायद्यांचा धिक्कार केला. अखिल भारतीय किसान सभा भारतीय ट्रेड युनियन केंद्र अखिलभारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व युपीए घटक पक्ष यांच्यासह पूर्ण देशातील शेतकरी पक्ष संघटना, डावे पक्ष संघटना, पुरोगामी व प्रागतिक विचारांच्या पक्ष संघटनांनी पुकारलेल्या 'भारत बंद' पाठिंबा देण्यात आला.
यावेळी दलितमित्र डी. डी. चौगले, कॉम्रेड अशोक चौगले, बी. एस. खामकर यांची भाषणे झाली.
या निषेध मोर्चात शेतकरी संघटना, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी प्रबोधिनी शाखा मुरगूड, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा मुरगूड, लाल बावटा कामगार संघटना, श्रमिक संघटना, बेघर संघटना, विद्रोही साहित्य चळवळ यांनी सहभाग घेतला. होता.
यावेळी मुरगूड शहर शिवसेनेचे अध्यक्ष व नगरसेवक नामदेवराव मेंडके, दिग्विजय पाटील, मधुकर मसवेकर, उद्योजक जोतिराम सूर्यवंशी, संजय दबडे, डी. एस. घाटगे, संदीप खंडागळे, डॉ. सुनील चौगले आदी उपस्थित होते.


0 टिप्पण्या