पोलीस प्रवाह न्यूज रायगड
आम्ही काळ्या काचेतून कामे करत नाही राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे कडाडले
रायगड : दि. ४ - माणगाव तालुक्यात २ आक्टोबर रोजी सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अंगणवाड्याना वाटप केलेल्या किट वरून शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस व पालकमंत्री अदिती तटकरे यांच्यावर पुरग्रस्तांना आलेले मदत किट आपण अंगणवाडी सेविकांना वाटून पुरग्रस्तांची च नव्हे तर अंगणवाडी सेविकांची क्रूर चेष्टा केली आहे. पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशा मुद्यांना हात घालत पत्रकार परिषद घेतली होती.
या पत्रकार परिषदेला माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुभाष केकाणे यांनी पलटवार केला आहे. दि. ०३ जून झालेल्या निसर्ग चक्री वादळात रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या यांचे पूर्णतः नुकसान झाले होते. त्यामुळे ही मदत आम्ही आता अंगणवाड्या शाळा सुरू हता आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्ही ही मदत करत आहोत. गेल्या १५ ते २० दिवसांपासून ही मदत महाड, पोलादपूर तालुक्यात करण्यात आली. या मदतीत कोणताही प्रकारचा भेदभाव न करता त्या त्या तालुक्यातील सर्वच अंगणवाड्याना साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळेला हे विरोध करणारे कुठे गेले होते? असा सवाल देखील केकाणे यांनी उपस्थित केला. आमचे राजकीय वरिष्ठ नेते यांच्यावर टिका टिप्पपाणी करताना शब्द सांभाळावे. आम्ही काळ्या काचेतून कामे करत नाही असे देखील शेकापच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर दिले आहे. सुनिल तटकरे प्रतिष्ठा चे किट सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानने वाटप केले कुणाचीही पोटदुखी असणे गरजेचे नाही. आणि पालकमंत्री यांनी राजीनामा देण्याचा काहीच संबंध नाही. आता एवढंच खूप आहे बाकी सगळे वेळ आल्यावर सांगू असे देखील सांगितले आहे. पालकामंत्र्याचा राजीनामा पत्रकार परिषदेला शेजारी बसणाऱ्यांची नार्को टेस्ट करणे गरजेचे आहे? असे सुभाष केकाणे म्हणाले. काळी कामे करणाऱ्या काळ्या मनाच्या माणसांना कितीही पांढरी कामे केलीत तरी काळीच दिसतात.
या पत्रकार परिषदेस मा. ता. रा. कॉ. अध्यक्ष सुभाष केकाणे, महिला अध्यक्षा संगीता बक्कम, चंद्रशेखर देशमुख, महाराष्ट्र प्रदेश युवक सचिव दिपक जाधव, शहर अध्यक्ष महमूद धुंदवारे, उणेगाव सरपंच राजू शिर्के, तालुका युवक अध्यक्ष रुपेश तोडकर,माजी नगरसेवक रत्नाकर उभारे, काका नवगणे, मा. उपसरपंच इकबाल हर्णेकर, अब्दुला गंग्रेकर, किशोरी हिरवे, तालुका महिला उपाध्यक्ष श्रद्धा यादव, संगीता चव्हाण हे उपस्थित होते.
आम्ही आमचेच किट अंगणवाडी सेविकांना वाटले आहेत.
कालच्या शेकाप चिटणीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उचललेला मुद्दा निष्फळ आहे.कारण पालकमंत्री यांचा राजीनामा मागणारा कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता हा त्या तोडीचा असावा लागतो.आम्ही अंगणवाडी सेविकांना किट वाटले नाहीत ते आपत्तीत नुकसान ग्रस्त अंगणवाडी यांच्याकरिता दिली आहे.त्यामुळे कुणालाही पोटशूळ उठण्याचे कारण नाही.
सुभाष केकाणे. राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष माणगाव




0 टिप्पण्या