डाॕ.राहूल पोवार यांनी जपली माणूसकी :- ओजस हाॕस्पिटल वर्धापन दिनानिमित्त वृद्ध सेवा आश्रम ला भेट देऊन जिवनावश्यक साहित्याचे वाटप.

 

डाॕ.राहूल पोवार यांनी जपली माणूसकी :- 

ओजस हाॕस्पिटल वर्धापन दिनानिमित्त  

वृद्ध सेवा आश्रम ला भेट देऊन जिवनावश्यक साहित्याचे वाटप.

सिद्धनेर्ली - ता.कागल येथील नदिकिनारा येथे 1 वर्षापुर्वी ओजस हाॕस्पिटल रुग्णसेवेसाठी सुरु केले.कोरोणा काळात रुग्णसंख्या खूपच वाढत होती. तसेच ग्रामीण भागामध्ये कोरणा बद्दल अनेक समज गैरसमज मनामध्ये घर धरून बसले होते अनेक सामान्य लोक औषध उपचारासाठी पैशाचा होणारा वारेमाप खर्चाच्या भीतीला घाबरून घरीच बसून होते. ही बाब लक्षात येताच डाॕ.राहूल पोवार यांनी काळाचे ,वेळेचे भान न ठेवता दिवस रात्र रुग्णांची सेवा केली.

   बाहेर ठिकाणी लाखों रु. बिल होत असतानाही त्यांनी स्वतःच्या अनुभवावर नाममात्र अगदी अल्प   रक्कमेत पेशंटला कोरोनापासून मुक्त केले. त्यांच्या या सेवेबद्दल भागातून खूप कौतुक देखील होत आहे.

 आज या ओजस हाॕस्पिटलला 1वर्ष पुर्ण होत आहे.यानिमित्त डाॕ.राहूल पोवार यांनी वृद्ध सेवा आश्रम ला  भेट देऊन जिवनावश्यक साहित्य देत माणुसकी जपण्याचे काम केले. यावेळी वृध्दाश्रमांच्या अध्यक्षा विमल सुतार यांनी डाॕ.पोवार यांनी दिलेल्या देणगीबद्दल आभार मानले व हाॕस्पिटल अजुनही मोठे होऊन जास्तीतजास्त रुग्णांची सेवा घडावी अशा शुभेच्छा दिल्या.

  यावेळी उपस्थित डाॕ.राहूल पोवार ,रोहिणी पोवार यांनी धान्य वाटप केले.यावेळी रेखा पोवार,नम्रतापोवार ,राकेश पोवार,केतन पोवार ,आर्नवी पोवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या