कोल्हापूर : शाहूपुरी पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अशोक मारुती पाटील यांचे शुक्रवारी (ता.१३ ऑगस्ट) निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. उपचारादरम्यान शुक्रवारी दुपारी खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ५१ वर्षाचे होते. अशोक मामा म्हणून ते परिचित होते.
अशोक पाटील हे खेळाडू होते. उत्कृष्ट गोळाफेक खेळाडू म्हणून गाजले होते. पोलिस दलात त्यांनी जवळपास तीन दशके नोकरी केली. गुन्हे शोध पथकात अनेक वर्षे काम केले. कागल, जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, राजारामपुरी पोलिस स्टेशनमध्ये नोकरी केली. सध्या ते शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार या पदावर होते. गेले काही दिवस ते आजारानी त्रस्त होते. खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होते. उपचार सुरू असताना त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. निगवे खालसा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.


0 टिप्पण्या