पोलीस उपअधीक्षक महामुनी यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर

 


पोलीस उपअधीक्षक महामुनी यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर.


इचलकरंजी : बलात्कार गुन्ह्याचा उत्कृष्टरित्या तपास केल्याने इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांना केंद्रीय गृहमंत्री पदक 2021 जाहीर करण्यात आले आहे. लवकरच त्यांना या पदकाने गौरवण्यात येणार आहे.

  राज्यातील एकूण अकरा पोलिस अधिकाऱ्यांना हा सन्मान मिळाला आहे.महामुनी बुलढाणा येथे असताना 26 एप्रिल 2021 रोजी चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याच्या गुन्ह्याच्या त्यांनी सखोल तपास केला होता.या घटनेच्या दुसर्‍याच दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता.

  या गुन्ह्यातील तांत्रिक, भौतिक पुरावे, वैद्यकीय पुरावे,साक्षीदार कागदोपत्री,पुरावे आदींच्या अनुषंगाने तपास करून दोन आरोपींवर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते न्यायालयाने त्यांना 13 ऑगस्ट 2020 रोजी फाशीची शिक्षा सुनावली होती.

 महामुनी यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना केंद्रीय गृहमंत्री पदक प्रदान करण्यात येणार आहे...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या