नाशिक (प्रतिनिधी ) : संपूर्ण देशात स्वातंत्र्यदिनाचे अमृत महोत्सवी वर्ष उत्साहाने साजरे होत असताना नाशिकच्या मंगल मैत्री वेल्फेअर फाउंडेशन आणि आयई सेंटर यांनी एक अभिनव उपक्रम राबवला आहे.देशभारतातून विविध क्षेत्रातील 21 जणांची निवड करून त्यांना 'आयकॉनिक इंडियन्स अवार्ड'-2021 ने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड येथील प्रसिद्ध पञकार दिपक साबळे यांनी पञकारीतेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल म्हणून या वर्षीचा आयकॉनिक इंडियन्स अवार्ड-2021 त्यांना प्रदान करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मद्वारे वेबिनार घेऊन देशभरातून 21 विजेत्यांना गौरविण्यात आले.
यामध्ये हरियाणा येथील लेखक व प्रशिक्षक करम पाल, झारखंड येथील विक्रमवीर शनी पासवान, तसेच महाराष्ट्रामधून नंदुरबार येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे, जालना येथील निलेश के. देशमाने, औरंगाबादचे प्रख्यात संमोहनतज्ञ एस. के. नांदेडकर तसेच लिम्का बुक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर मेमरी गुरू सचिन कुमार, नांदेड येथील पत्रकार राजकिशोर ससाने व इंटरनॅशनल मेमरी कोच कृष्णा सावंत, तसेच नाशिक मधील सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी राहुल भामरे, राहुल गणोरे-कोरोना योद्धा, शालिनी शेळके, विराट दुधवडे, पूजा गटकळ, पत्रकार चंदन खतेले, इशाक शेख, सचिन बेडीस तर शिक्षण क्षेत्रासाठी प्रोफेसर भास्कर नरवटे, एनएलपी कोच अंजली बोरकर, पुणे येथील पत्रकार दिपक साबळे, अमरावती येथून महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार विजेते प्रवीण पनपालिया व आंतरराष्ट्रीय फिल्म पुरस्कार विजेते निलेश आंबेडकर यांचा सन्मान करण्यात आला.
समाजात काम करत असताना त्या कार्याची पोचपावती म्हणून पाठीवर शाबासकीची थाप पडणे नेहमीच गरजेचे असते, त्यामुळेच पुढील कार्य करण्यास प्रेरणा मिळते असे मत यावेळी आयकॉनिक इंडियन्स अवार्ड चे प्रायोजक बेस्ट सेलर लेखक प्रशिक्षक सर नागेश जोंधळे यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मुख्यस्थानी IIA चे हेड राहुल बनसोडे होते.



0 टिप्पण्या