सिद्धनेर्ली - " 15 ऑगस्ट एक सलामी देशासाठी - एक सलामी वृक्षासाठी " या उपक्रमाअंतर्गत जनजागृती करण्याबाबत सरपंच दत्तात्रय पाटील यांना निवेदन देताना निसर्ग व पर्यावरण संघटनेचे कार्यकर्ते.
सिद्धनेर्ली - रविवारी ता. 15 अमृतमहोत्सवी भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त एक सलामी देशासाठी एक सलामी वृक्षासाठी असा पर्यावरण पूरक व नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.निसर्ग व पर्यावरण संघटनेमार्फत हा उपक्रम आयोजन केले आहे.नागरिकांना स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र येता येणार नाही म्हणून येथील निसर्ग व पर्यावरण संघटनेने लोकवर्गणी व लोकसहभागातून शिवराज्याभिषेक व पर्यावरण दिनानिमित्त देशी वृक्षांची लागवड केली आहे आता नागरिकांनी त्यांना उपलब्ध असलेल्या जागेमध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक पद्धतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा करावा असे आवाहन केले आहे. गावातील शाळा,महाविद्यालय, विविध संस्था,तरुण मंडळे यांनी किमान एक वृक्ष लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या वृक्षारोपणासाठी संघटनेमार्फत सवलतीच्या दरामध्ये गावातच देशी पर्यावरण पूरक वृक्षांचे रोपे उपलब्ध करून देण्यात येणार आहे..


0 टिप्पण्या