अतिवृष्टीने माणगांव तालुक्याला झोडपले ; शासकीय कार्यालयांसहित अंतर्गत रस्ते तुंबले...गटाराचे पाणी वाहतुकीच्या रस्त्यांवर


फोटो- पुणे दिघी हायवेवर मोर्बा साई घाटात  दरड कोसळल्याने माणगांव मार्गे श्रीवर्धन वाहतूक बंद करण्यात आली.

पोलीस प्रवाह न्यूज रायगड

रायगड : दि. सतत ४ दिवस रायगड जिल्ह्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड प्रशासनाने पुढील ५ दिवस रेड अलर्ट जारी केला आहे.मात्र १८ जुलै रोजी दिवस रात्र झालेल्या पावसाने माणगांव तालुक्यात हाहाकार माजला. मुंबई गोवा हायवे चे काम व कोकण रेल्वे दुपदरीकरण यांच्या कामात केलेल्या भरावा मुळे माणगांव शहरासह तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली.

        *माणगांव नगरपंचायत प्रांगणाला तलावाचे स्वरूप*

माणगाव शहरातील नगरपंचायत कार्यलयाच्या पटांगणने तर तलावाचे स्वरूप धारण केले,सकाळी सुमारे १० वाजेपर्यंत पावसाचा जोरओसल्यानंतर  नगरपंचायत कर्मचारी यांच्या माध्यमातून पाणी बाहेर काढण्यास यश आले.


फोटो -  मुंबई - गोवा हायवेवरील खरवली फाटा, कळमजे पुलापासून पुढे सर्व परिसर जलमय परिस्थिती दिसत आहे.

*शहरातील कचेरी रोड बामणोली रोड, निजामपूर रोड सह मुंबई गोवा हायवेवर पाणीच पाणी...*

माणगांव शहरातील कचेरी रोड, निजामपूर रोड,बामणोली परिसरात, रस्त्यावर आलेल्या गुडघाभर पाण्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला,व शेजारच्या गटाराचे पाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी निर्माण झाली.मुंबई गोवा हायवेचे काम चालू असल्याने हायवेवरील खरवली फाटा, कळमजे पुलापासून पुढे सर्व परिसर जलमय झाला.

*रेल्वे स्टेशन नाणोरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर कंबरेइतपत पाणी आल्याने नाणोरे गावचा संपर्क तुटला*


फोटो- काळनदी, गोदनदी तुडुंब भरून वाहताना दिसून येत आहेत.

    तालुक्यातील काळ नदी,गोद नदी तुडुंब भरून वाहताना दिसून येत आहेत. माणगांव रेल्वे स्टेशन परिसरात पाणी जमा झाल्याने नाणोरे  गावचा संपर्क तुटला. पुणे दिघी हायवेवर मोर्बा साई घाटात  दरड कोसळल्याने माणगांव मार्गे श्रीवर्धन वाहतूक बंद करण्यात आली. खासदार सुनिल तटकरे यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत कोकण रेल्वे काम करणारी कंपनी आणि मुंबई गोवा हायवे चे कन्स्ट्रक्शन करणारी कंपनी यांचे अधिकारी व तालुका प्रशासकीय अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन पावसाळी पूर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची तंबी दिली होती मात्र ह्या कंपन्यांचे अधिकारी यांनी मान्सूनपूर्व कामाकडे कानाडोळा केल्याने माणगांव करांवर ही परिस्थिती ओढवली असल्याचे मत तालुक्यातील नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.


बातमी आणि जाहिरातीसाठी संपर्क पोलीस प्रवाह न्यूज
✒️संपादक ✒️
नवनाथ कापले - ०९८५०३५8८००५
✒️वृत्तसंपादक ✒️
परेश शिंदे   -  ०९९७५२५४४४२




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या