सिद्धनेर्ली येथे नामफलकाचे शालाबाई राजाराम कांबळे (सेवानिवृत्त कर्मचारी ग्रा.पं.सिद्धनेर्ली) यांच्या हस्ते अनावरण..
वृक्ष संवर्धन व पर्यावरण संघटना सिद्धनेर्ली यांच्यावतीने सिद्धनेर्ली पाटी याठिकाणी नामफलकाचे शालाबाई राजाराम कांबळे( निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी) यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आले.
वृक्ष संवर्धन व पर्यावरण संघटना सिद्धनेर्ली यांनी 5 जून पर्यावरण दिन व 6 जून शिवराज्यभिषेक दिन याचे औचित्य साधून गावामध्ये दीडशे पर्यावरण पूरक वृक्षांचे लोकसहभागातून रोपण करण्यात आले होते.
गावचे नाव हे सामाजिक,राजकीय सांस्कृतिक ,आध्यात्मिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात सर्वदूर सुपरिचित आहे, पण गावच्या वेशीवरती गावच्या नावाचा फलकाचे कमतरता होती. त्यामुळे अनेक प्रवाशांना गाव ओळखण्यासाठी अडचण निर्माण होत होती. हीच अडचण दूर करण्यासाठी वृक्ष संवर्धन व पर्यावरण संघटना यांच्या वतीने या ठिकाणी आज फलकाचे उद्घाटन करण्यात आले या फलकाचे उद्घाटन करण्यासाठी सिद्धनेर्ली ग्रामपंचायतीमध्ये गेली 21 वर्षे प्रामाणिक तन-मन-धनाने काम करणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचारी शालाबाई राजाराम कांबळे यांच्या हस्ते या फलकाचे अनावरण करण्यात आले.
प्रामाणिक व सचोटीने गावची सेवा करणाऱ्या वंचित व अशा सामान्य व्यक्तींच्या हस्ते गावच्या फलकाचे अनावरण करणे चा सन्मान दिल्याबद्दल शालाबाई कांबळे यांनी खूप भावनिक होऊन उपस्थितांचे आभार मानले.जरी मी सेवानिवृत्त झाले असले तरी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या परीने मी गावची प्रामाणिक सेवा करीतच राहील असे उदगार त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले..
शालाबाई राजाराम कांबळे या सेवानिवृत्त झाल्याबद्दल संघटनेच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व फेटा घालून सन्मान करण्यात आला.
इथून पुढे देखील गावामध्ये प्रामाणिक काम करणाऱ्या सर्वच सामान्य व्यक्तींचा योग्य तो सन्मान केला जाईल असे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले.
यावेळी सर्व ग्रामस्थ व वृक्ष संवर्धन व पर्यावरण संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.




0 टिप्पण्या