रायगड : दि. १० - रायगड रत्नागिरी लोकसभा ३२ चे खासदार सुनिल तटकरे यांचा वाढदिवस रायगड जिल्ह्यात विविध लोकोपयोगी कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.माणगांव शहरातही अनेक लोकहिताचे कार्यक्रम करण्यात आले दरवर्षी खासदार तटकरे यांचा वाढदिवस त्यांच्या मूळगावी सुतारवाडी येथे अनेक चाहत्यांच्या उपस्थितीत पार पडतो .मात्र गेल्या वर्षी पासून कोरोना संक्रमणाच्या वेगवेगळ्या लाटांचा आपण सामना करत आहोत हे पाहता रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशाने यावर्षी देखील वाढदिवस आपल्या गावच्या लोकपयोगी कार्यक्रमांनी साजरा करा असे आदेश देण्यात आले होते.
याचाच एक भाग म्हणून माणगाव नगरीच्या प्रथम महिला नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांच्या संकल्पनेतून कोरोना व लॉक डाऊन परिस्थिती मध्ये हातावर पोट असलेला सर्व सामान्य वर्ग म्हणजे रिक्षा व्यवसायिक यांच्या कडे पाहता माणगांव शहरातील माणगाव तालुका रिक्षा चालक मालक संघटना, ओम साई रिक्षा चालक मालक संघटना ,सिद्धिविनायक रिक्षा चालक मालक संघटना आणि तालुक्यातील व शहरातील इतर संघटित व असंघटित असणाऱ्या सुमारे ३०० रिक्षा व्यवसायिकांना एक आठवडा पुरेल इतके जीवनावश्यक अन्नधान्य किट चे मोफत वाटप माणगांव नगरपंचायत प्रांगणात करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा योगिता चव्हाण यांच्यासह उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी नगराध्यक्ष आनंद यादव,माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, गटनेते संदीप खरंगटे,सभापती जयंत बोडेरे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्व नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायत कर्मचारी,व माणगांव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस च्या विविध सेल चे पदाधिकारी व कार्यकर्ते कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून उपस्थित होते.




0 टिप्पण्या