वाढदिवसाचे औचित्य साधून केले 50 रोपांचे वृक्षारोपण - अजित पोतदार (रेदाळ) यांच्या या सामाजिक भावनेबद्दल परिसरातून होतंय कौतुकाचा वर्षाव...
कोल्हापूर प्रतिनिधी -
सध्याच्या कोरोनाच्या काळात सर्वत्रच ऑक्सिजनचा तुटवडा व त्याची गरज सर्वांनाच भासत आहे, अशातच प्रत्येक जण आपापल्या परीने तर,मन, धनाने या परिस्थितीला सामोरे जात आहे..
रेंदाळ येथील सुप्रसिद्ध सराफ श्री. अजित पोतदार यांनीही याच सामाजिक भावनेतून आपणही काहीतरी समाजासाठी देणं लागतो या उदात्त हेतूने आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून त्याचा सकारात्मक उपयोग व्हावा असा विचार त्यांच्या मित्रमंडळींच्या मध्ये मांडला,आणि यातूनच गावातील वृक्ष प्रेमी यांच्या सहकार्याने कार्याला सुरुवात झाली.
यातूनच महालक्ष्मी ज्वेलर्स चे श्री. अजित पोतदार तसेच गावातील सर्वांच्या सहकार्यातून रविवारी 4/07/2021 रोजी रेदाळ मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी रामनगर येथील महावीर पाटील, शितल पोतदार,संजय घोरपडे, कृषी तज्ञ सुनील करडे, संजय तांबे,परशुराम हवालदार,मोहन खोत,रणजीत खोत,सचिन करडे, संजय चौगुले,राजकुमार नाईक, रोहित शिंगारे, किरण वाळके,अमोल मांगलेकर,रामचंद्र महाजन,भरत गवळी,कुमार साळुंके इ. सर्वांच्या उपस्थितीत हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला..


0 टिप्पण्या