पोलीस प्रवाह न्यूज रायगड
माणगाव तालुका पत्रकार सेवा संघ आणि अंकुर फाउंडेशन चा पुढाकार.
रायगड: दि. २३ - माणगांव तालुक्यात १९ जून रोजी जेष्ठ पत्रकार अरुण दादा पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ व गेले १३ वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करणारे अंकुर फाउंडेशन व वन परिक्षेत्र विभाग माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने माणगांव लोणेरे विभागातील पन्हळघर ग्रामपंचायत हद्दीतील पन्हळघर बुद्रुक अदिवासी वाडीत वृक्षरोपण करण्यात आले व वाडीतील एकूण ३९ कुटुंबाना एक आठवडा पुरेल इतके अन्नधान्य देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी गोरेगाव पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले स्वदेश फाउंडेशनचे तुषार इनामदार, माणगाव तालुका पत्रकार संघाचे संस्थापक अरुण पोवार, मा.सभापती महेंद्र तेटगुरे, अंकुर फाउंडेशन चे सल्लागार मंगेश पेठे, माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाचे तालुका अध्यक्ष रवींद्र कुवेसकर , उपाध्यक्ष प्रमोद जाधव, कार्याध्यक्ष उदय चव्हाण, जेष्ठ सल्लागार अनिल मोकाशी, सचिव सुनील राजबर, खजिनदार परेश शिंदे, सहखजिनदार वैभव सत्वे, प्रसिध्दिप्रमुख राम भोस्तेकर, पत्रकार निरंजन कळस, मुकेशकडू, पांडुरंग माने, किरण शिंदे, चिंतामणी बटवले, मारूती, ग्रामपंचायत सदस्य अंजली घोगरेकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लक्ष्मण घोगरेकर, न्हावे मा.सरपंच शशिकांत अंधेरे, पन्हळघर बुद्रुक आदिवासी वाडीतील ग्रामस्थ हजर होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पन्हळघर बुद्रुक अदिवासीवाडी रा जि प शाळेचे मुख्याध्यापक सुजित भोजने यांनी केले.
या कार्यक्रमात पन्हळघर बुद्रुक आदिवासी वाडीत वड,पिंपळ,जांभूळ व जंगली झाडे व व फळ झाडे यांचे वृक्षारोपण करण्यात आले, या कार्यक्रमात आपल्या मनोगतात विचार मांडताना स्वदेस फाउंडेशन चे प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार म्हणाले की? माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाने माणगांव ते लाखपाले हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण खूप याकरिता नागरिकांकरिता रुग्णवाहिकेची मागणी केली आहे व ती मागणी स्वदेस चे संचालक व व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून लवकर मार्गी असे मत इनामदार यांनी व्यक्त केले व लोकशाही चा चौथा स्तंभ देखील जनसेवेच्या मागण्याकरिता पुढे सरसावला आहे व अग्रक्रम देखिल प्राप्त केला आहे त्यामुळे पत्रकारांची मागणी आम्हाला मान्य करावीच लागेल असे देखील तुषार इनामदार यांनी स्पष्ट केले. माणगांव तालुका पत्रकार सेवा संघ व अंकुर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात घेतलेल्या या उपक्रमाचे माणगाव तालुक्यातून कौतुक होत आहे.





0 टिप्पण्या