पोलीस प्रवाह न्यूज रायगड
रायगड दि. २१ - रायगड जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव तालुका पत्रकार सेवा संघाची स्थापना करण्यात आली. माणगाव तालुका पत्रकार सेवा संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार व व्यंगचित्रकार रवींद्र कुवेसकर यांची एकमताने माणगाव येथे झालेल्या पत्रकारांच्या सभेत निवड करण्यात आली.
या सभेत माणगाव व रायगड जिल्ह्यातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी या स्वतंत्र पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. रवींद्र कुवेसकर हे तीस वर्षे पत्रकारिता करीत आहेत. त्यांनी आपल्या धारधार लेखणीतून अनेक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. ते सतत सामाजिक प्रश्नांवर आपल्या लेखणीतून भाष्य करीत असतात. कोविड जनजागृती, सामाजिक आरोग्य, विविध समस्या लोकांसमोर मांडल्या आहेत. त्यांच्याकडून नेहमीच दर्जेदार लिखाण होत असल्याने संस्थापक अरुण पवार व सहकारी पत्रकारांनी त्यांची अध्यक्षस्थानी निवडले.
'समस्या तुमची साथ आमची' हे ब्रीद वाक्य घेऊन या पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदी प्रमोद जाधव, सल्लागार अनिल मोकाशी, कार्याध्यक्ष उदय चव्हाण, सेक्रेटरी सुनील राजभर, खजिनदार परेश शिंदे, सहखजिनदार वैभव सत्वे, प्रसिद्धिप्रमुख राम भोस्तेकर तर सदस्य पदी निरंजन कळस, प्रमोद मोहिरे, मुकेश कडू, नचिकेत म्हापसेकर, पांडुरंग माने प्रतीक मोरे यांनी निवड करण्यात आली.




0 टिप्पण्या