शिर्डी - श्रीरामनवमी उत्‍सव कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर साध्‍या पध्‍दतीने साजरा

शिर्डी – प्रतिनिधी राहुल फुंदे

        श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने आयोजित केलेला श्रीरामनवमी उत्‍सव कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर साध्‍या पध्‍दतीने साजरा करण्‍यात आला असून उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रुढी परंपरेनुसार सर्व कार्यक्रम पार पडले.

         उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे ०४.३० वाजता श्रींची काकड आरती झाल्‍यानंतर श्री साईसच्‍चरित्र या पवित्र ग्रंथाच्‍या  अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. पारायण समाप्‍तीनंतर श्री साईबाबांच्‍या प्रतिमेची व श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात आली. या मिरवणूकीत संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी वीणा, उप मुख्‍यकार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर यांनी पोथी आणि वैद्यकीय अधिकारी डॉ.राम नाईक व डॉ.अविनाश जाधवर यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व पुजारी उपस्थित होते. सकाळी ०६.०० वाजता संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.वैशाली ठाकरे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात पाद्यपुजा करण्‍यात आली. 

       


  सकाळी ०९.०० वाजता संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.वैशाली ठाकरे यांच्‍या हस्‍ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्‍दी स्‍तंभाच्‍या ध्‍वजाचे विधीवत पुजन व व्‍दारकामाई मंदिरातील गव्‍हाच्‍या पोत्‍याची पुजा करण्‍यात आली. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी व पुजारी उपस्थित होते. सकाळी १०.०० वाजता मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे श्रीरामजन्‍मावर कीर्तन झाले. दुपारी १२.०० वाजता कीर्तनानंतर समाधी मंदिरात प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.वैशाली ठाकरे यांच्‍या हस्‍ते श्रीरामजन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. यावेळी संस्‍थानचे मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी उपस्थित होते. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. दुपारी ०४.०० वाजता मंदिर कर्मचा-यांचे हस्‍ते व्‍दारकामाई मंदिरावरील निशाणे बदलण्‍यात आले. सायंकाळी ०६.३० वाजता श्रींची धुपारती करण्यात आली. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती करण्‍यात आली.

          यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरातील प्रवेशव्‍दार क्रमांक ०४ च्‍या समोर परभणी येथील जीवन कौशल्‍य आर्ट च्‍या १२ कलाकारांनी श्रीराम व श्री साईबाबा यांची भव्‍य अशी रांगोळी साकारली. या कलाकारांनी ३९ x २४ अशी सुमारे ९०० चौ.फुट आकाराची व ०४ x ०३ आकाराच्‍या ०३ रांगोळ्या अशा एकुण ०४ रांगोळ्या साकारल्‍या. याकरीता  ज्ञानेश्वर आप्पाराव बर्वे, सौ.संजना उमेश लकारे (ज्‍योती अरुण मेहेरे) कु.कांचन अनिल तळेकर, कु.स्नेहा प्रभाकर बिडवे, योगेश प्रसादराव मगर, गोपाळ बाळासाहेब वडवाले, प्रदीप अर्जुनराव मेकेवाड, प्रकाश नारायण बारबिंड, प्रद्युम्न मधुकर उमरीकर यांच्‍यासह सौ.कल्याणी महेंद्र कुसाळे, अजय बन्सीलाल मेहेरे, उमेश राधाकिसन लकारेया याकलाकारांनी सुमारे ४० तास परिश्रम घेतले. संस्‍थानच्‍या वतीने सर्व कलाकारांचा प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व संरक्षण अधिकारी पोलिस उपनिरिक्षक आण्‍णासाहेब परदेशी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. तसेच उत्सवाच्या निमित्ताने शिंगवे ता.कोपरगांव येथील निलेश नरोडे, मे.ओमसाई इलेक्‍ट्रि‍कल डेकोरेटर्स यांनी मंदिर व परिसरात देणगीस्‍वरुपात आकर्षक विद्युत रोषणाई केली. तर कर्नाटक राज्‍यातील हुबळी येथील दानशूर साईभक्‍त श्री.बी.एस.आमली यांच्‍या देणगीतून समाधी मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्‍यात आली.

          उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी गुरुवार, दिनांक २२ एप्रिल रोजी पहाटे ०४.३० वाजता काकड आरती, सकाळी ०५.२० वाजता श्रीं चे मंगल स्‍नान, सकाळी ०६.०० वाजता श्रीं ची पाद्यपूजा, सकाळी ०६.३० वाजता गुरुस्‍थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा होईल. सकाळी १०.०० वाजता गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार असून दुपारी १२.१० वाजता श्रीं ची माध्‍यान्‍ह आरती, सायंकाळी ०६.३० वाजता श्रीं ची धुपारती होऊन रात्रौ १०.३० वाजता शेजारती होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या