कोविड नियमांचे उल्लंघन करुन बैलगाडी शर्यत करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

पोलीस प्रवाह न्युज रायगड 

कोविडमध्ये बैलगाडी शर्यत ; पोलिसांची कारवाई

रायगड : दि २० - बैलगाडी शर्यतींना महाराष्ट्र शासनाची बंदी कायम असताना तसेच कोणतीही  परवानगी नसताना त्यातच कोविडचे प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करून बैलगाड्यांची शर्यत आयोजित करणाऱ्यांवर गोरेगांव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

गोरेगांव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिवली कोंड येथे बैलगाड्यांची शर्यत आयोजित केल्याची माहिती गोरेगांव पोलीस ठाणयाचे सहा पोलीस निरीक्षक सुनिल अवसरमोल यांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्यासह श्री अवसर मोल आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा मारला. यावेळी तेथे शर्यतीसाठी आलेल्या सहा बैलगाड्या आणि गाडीवान बैलांना टोकदार वस्तु लावून बैलांना अमानुषपणे  पळवित असताना पोलिसांना दिसून आले. 

ताबडतोब पोलिसांनी सहा बैलगाड्या जप्त केल्या असुन सहापैकी तिघ गाडीवान ना  पोलिसांनी ताब्यात घेतली असुन  मात्र तीन गाडीवान आणि अन्य लोक फरार झाले.

गोरेगांव पोलीस ठाण्यात उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या