स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही खर्डी खुर्द,नेराव,सुतारवाडी ते उंडरेवाडी रस्त्याच्या कामाला मुहूर्त मिळेना, ग्रामस्थांचे हाल.

    

खा. तटकरेंना स्वराज्य संघटनेकडून पंकज तांबेचे निवेदन.

पोलीस प्रवाह न्युज.

रायगड: दि.१ - देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे होत आली असतानाही माणगाव तालुक्यातील मौजे खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याच्या कामाला अजूनही मुहूर्त मिळालेला नसून या रस्त्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधींनी पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याबाबत खा.सुनील तटकरे यांना माणगाव येथे दि.१ मार्च २०२१ रोजी माणगाव स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे व कार्यकर्ते स्वप्नील शिर्के यांनी निवेदन देऊन सदरच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी विनंती खा.तटकरे यांना पंकज तांबे यांनी केली. यावेळी माणगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी प्रशाली जाधव दिघावकर,तहसीलदार प्रियांका आयरे,माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष केकाणे ,माजी नगराध्यक्ष आनंदशेठ यादव,योगिता चव्हाण,माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर  उभारे,दिलीप जाधव ,संदीप खरंगटे ,माजी नगरसेवक नितीन वाढवळ,जयंत बोडेरे, माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष महामूद धुंदवारे,शेकापचे युवानेते निलेश थोरे,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुमित काळे,मयूर शेट आदी उपस्थित होते. 

मौजे खर्डी खुर्द,नेराव,सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून स्वतंत्रप्राप्तीच्या ७५ वर्षांनंतरही या रस्त्याची समस्या सुटली नसल्याने येथील ग्रामस्थांचे पुरते हाल झाले आहेत. या भागातील ग्रामस्थांना कोणीच वाली नसल्याचे म्हटले तर ते वाउगे ठरणार नाही.नेराव गावातील ग्रामस्थांना माणगावची बाजारपेठ जवळ असल्यामुळे याच रस्त्याचा वापर करावा लागतो.या गावातील बहुतांशी ग्रामस्थांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे.येथील दूध विक्रेते दररोज डोक्यावरून दूध घेऊन माणगावात हॉटेल व घरांमधून दूध देत असतात.या गावातील वयोवृद्ध माणूस आजारी पडला तर त्यांना डोलीतुन बसवून औषोधोपचारासाठी माणगाव येथील रुग्णालयात आणावे लागते. 

तसेच येथील विद्यार्थ्यांना पायपीट करून पाच किमी अंतर यावे लागते.खर्डी खुर्द येथून माणगावला येण्यासाठी पक्का रस्ता आहे. परंतु मौजे खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या दरम्यानचा रस्ता अत्यंत खराब झाल्याने या गावातील ग्रामस्थांचे हाल होऊन त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या गावांतून लोकप्रतिनिधी निवडणुका आल्यावर केवळ मतांचा जोगवा घेण्यासाठी जातात.मात्र निवडणुका झाल्यावर या गावांकडे  कोणीच फिरकून पाहत नाही.त्यामुळे येथील रस्त्याचे काम आद्यपही मार्गी लागलेले नाही.या रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे याबाबत खा.सुनील तटकरे यांना स्वराज्य संघटना माणगावतर्फे संस्थापक पंकज तांबे व सहकारी स्वप्नील शिर्के यांनी निवेदन देऊन विनंती केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या