भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा आघाडीच्या उपाध्यक्षपदी मा.शितल पोतदार यांची निवड


*भारतीय जनता पार्टी ओबीसी जिल्हा आघाडीच्या उपाध्यक्षपदी मा.शितल पोतदार यांची निवड*


कोल्हापूर

भारतीय जनता पार्टी ओबीसी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी शितल पोतदार (रेंदाळकर) यांची नियुक्ती करण्यात आली.


शितल पोतदार अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.अखिल भारतीय सुवर्णकार समाज संघर्ष कृती समितीच्या सचिव पदी त्यांनी


 आपली कार्याची चुणूक दाखवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोनार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत.तसेच गावामध्ये अनेक सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून जनसेवेची कामे ते करत असतात.


पक्षाने दिलेली जबाबदारी ही माझ्या आजपर्यंतच्या कामाची पोचपावतीच आहे तसेच इथून पुढच्या काळात देखील तन-मन-धनाने 


पक्षाची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन पोतदार यांनी पत्रकारांशी बोलताना केले.


 सदर निवडीचे पत्र भाजपा कोल्हापूर जिल्हाद्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते स्वीकारताना शितल पोतदार तसेच


भाजप रेंदाळ चे शहर अध्यक्ष सचिन मेथे

भाजप युवामोर्चा अध्यक्ष नितीन पाटील,किरण वाडकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या