तुमचं शरीर निरुपयोगी होऊ देऊ नका याकरिता शरीर सौष्ठव सांभाळा- डी. वाय. एस. पी. प्रविण पाटील

पोलीस प्रवाह न्युज रायगड

व्यायाम करणाऱ्या ८५ वर्षीय तरुणाचा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांच्या हस्ते सत्कार

रायगड : दि.६ - हल्लीचे जग हे खूप धावपळीचे आहे. राहणीमानाचा दर्जा खालावत चालेला आहे. तरुण पिढी बरोबरच सर्वच वयोगटातील व्यक्तींनी सुदृढ आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. याकरिता दैनंदिन आहारासोबतच व्यायामाची सुद्धा तितकीच आवश्यकता आहे. कामाचा वाढता ताणतणाव, रासायनिक युक्त अन्नधान्याचा पुरवठा यासर्व गोष्टींकडे पाहता शरीर निरोगी व सदृढ ठेवणे तितकेच गरजेचे आहे. तुमचं शरीर निरुपयोगी होऊ देऊ नका. कारण वयाच्या ठराविक वर्षांनंतर शरीरातील उत्तेजन, हालचाली यांचा वेग मंदावतो. वृध्दपकाळातील शरीर कुटूंबियांना नकोसे वाटते. तसेच तुमच्या सुदृढ शरिरामुळे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात पहिली पसंती मिळून अर्धे काम सोपे होते. याकरिता व्यायाम महत्त्वाचा आहे. असे मत माणगांवचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील यांनी माणगांवमधील मसल्स प्लॅनेट फिटनेस क्लब या व्यायाम शाळेतील ८५ वर्षीय बाळकृष्ण तुकाराम ढमाले यांच्या सत्कार कार्यक्रमात व्यक्त केले.

दि. ६ फेब्रुवारी रोजी मसल्स प्लॅनेट फिटनेस क्लबमध्ये सत्कार समारंभ पार पडला. बाळकृष्ण ढमाले हे वयाच्या ८५ व्या वर्षी सुद्धा एखाद्या तरुणाला लाजवतील असा शारीरिक बांधा ठेऊन नियमित व्यायाम करतात. त्यांचा जन्म माणगांव तालुक्यातील होडगांव कोंड गावी झाला. त्यांनी २० वर्ष कॅडबरी या कंपनीमध्ये सेवा केलेली आहे. कौटुंबिक जीवनातून देखील वेळ काढून ते नियमित होडगाव कोंड ते माणगांव प्रवास करीत व्यायामाकरिता येत असतात. 

अशा ८५ वर्षीय तरुणाच्या जिद्दीला प्रोत्साहन देण्याकरिता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविण पाटील, जेष्ठ पत्रकार व व्यंगचित्रकार रविंद्र कुवेसकर, व्यायाम शाळेचे प्रशिक्षक सुमित सकपाळ, उद्योजक नारायण शेट, पत्रकार परेश शिंदे, निरंजन कळस, सुनिल राजभर, चिन्मय म्हापसेकर, रुपेश पोवार, प्रमोद जाधव, वैभव सत्वे व व्यायाम शाळेतील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या