प्रशासकीय सेवेतील दोन पोलीस अधिकारी डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी मार्फत ब्लॅक बेल्ट





*प्रशासकीय सेवेतील दोन पोलीस अधिकारी डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी मार्फत ब्लॅक बेल्ट*

डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमीचे ब्लॅक बेल्ट विद्यार्थी पोलीस अधिकारी व प्रशासकीय सेवेत देशाचे संरक्षण करून आपले कर्तव्य बजावत आहेत परंतु यावर्षी प्रशासकीय सेवेतील दोन पोलीस अधिकारी यांनी स्वतः ब्लॅक बेल्ट बेल्ट परीक्षा देऊन ब्लॅक बेल्ट मिळविला आहे. डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमी साठी हि एक अभिमानाची बाब आहे. अरविंद मोरे (जागतिक विश्वविक्रमवीर व झी टीव्ही अटकेपार झेंडा विजेता) व शाम भोसले (अध्यक्ष युवा आधार संस्था, महाराष्ट्र राज्य )यांच्या मार्गदर्शनाखाली ब्लॅक बेल्ट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या १)बंडू बन्सी नवथर (पोलीस नाईक, महाराष्ट्र पोलीस) २)कृष्णा सुखदेव हेंगाडे (पोलीस हवालदार, महाराष्ट्र पोलीस) यांचा संस्थेमार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 

युवा आधार संस्था व स्पोर्ट्स अँड एज्युकेशन डेव्हलोपमेंट सोसायटी अंतर्गत डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी व पोलीस प्रवाह न्यूज द्वारा ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र वितरण व २०१९ – २० गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा स्वा. सावरकर सदन, सेक्टर -२५, मदनलाल धिंग्रा मैदानाजवळ, प्राधिकरण, निगडी, पुणे -४४ येथे मा. राम मांडुरके (मा. सहाय्यक पोलीस आयुक्त - पिंपरी विभाग), मा. शाम भोसले (अध्यक्ष – युवा आधार संस्था, महाराष्ट्र राज्य), मा. डॉ. विवेक मुगळीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक- वाकड पोलीस स्टेशन), मा. शंकर अवताडे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक-भोसरी पोलीस स्टेशन), मा.श्री. विनायक साळुंखे (पोलीस निरीक्षक – पुणे वाहतूक विभाग), मा. फरीद गफूर सय्यद (मा. पोलीस निरीक्षक – ठाणे), मा. राहुल मखरे (सहा. पोलीस उपनिरीक्षक – पुणे वाहतूक विभाग) मा. फिरोज शेख (अध्यक्ष – माध्य. व उच्च माध्य. शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर), मा. निवृत्ती काळभोर (संचालक – माध्य. व उच्च माध्य. शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ पिंपरी चिंचवड शहर) यांच्या उपस्थितीत पार पडला 

डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडेमला २७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यात ब्लॅक बेल्ट प्रमाणपत्र वितरण, अक्षय कुमार १२ वी इंटरनॅशनल NBSII काता स्पर्धा 2020, नागेश मोरे मेमोरियल चौथी NBSII जिल्हा स्पर्धा व रेफ्री प्रमाणपत्र वितरण व पोलीस प्रवाह न्यूज रिपोर्टर ऑफ द इयर सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या