*कोल्हापूर - रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उडान व उर्वी उमन्स क्लब ने केली वाहतूक नियमांची जनजागृती.*

 



*कोल्हापूर - रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उडान व उर्वी उमन्स क्लब ने केली वाहतूक नियमांची जनजागृती.*


                  ज्या समाजात आपण राहतोय त्या समाजाचे आपणही काहीतरी देणे लागतोय या सामाजिक बांधिलकीतुन उडान फौंडेशन आणि उर्वी उमन्स क्लब करत असलेले काम हे कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात आपले नेहमी सहकार्य राहील असे गौरवोद्गार राष्ट्रीय महामार्ग पोलीस मदत केंद्र उजळाईवाडी चे पोलीस निरीक्षक महादेव जानकर यांनी काढले.

उडान फौंडेशन कडून सुरू करण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा अभियानाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

            कोल्हापूर शहरातील वाढती वाहतूक समस्या आणि या समस्यांमुळे अपघातांची वाढती संख्या लक्षात घेता राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत उडान फौंडेशन आणि उर्वी उमन्स क्लब कडून शहरामध्ये विविध ठिकाणी जनजागृती अभियानाची सुरुवात राजर्षी शाहू टोल नाका, उजळाईवाडी येथे करण्यात आली.

                 या अभियानाची सुरुवात महादेव जानकर सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. 

                या अभियानात वाहनांना स्टिकर लावून आणि लोकांना पाम्प्लेट देऊन वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले. या अभियानात लोन रेंजर्स ग्रुप, क्षत्रिय फौंडेशन, यांनी सुद्धा हिरीरीने सहभाग घेतला. उडान फौंडेशन कडून रस्ता सुरक्षा अभियान वर्षभर राबवण्यात येणार आहे.

              या कार्यक्रमासाठी उडान फौंडेशनचे अध्यक्ष भुषण लाड, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, उर्वी उमन्स क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच लोन रेंजर्स ग्रुपचे व क्षत्रिय फौंडेशनचे सदस्य उपस्थित होते. सूत्रसंचालन रोहन माने यांनी केले तर आभार अजित कोळस्कर यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या