शेतकऱ्यांबरोबर कामगारांची देखील केंद्र सरकारकडून हेळसांड- जलसंपदामंत्री जयंत पाटील.


पोलीस प्रवाह न्यूज़

भव्य जलसंपदा भवनाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न.

रायगड : दि. २५ - रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगांव तालुक्यात भव्य जलसंपदा भवनाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्य जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत खा. सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दि. २५ जानेवारी रोजी पार पडला. 

यावेळी राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांनी बोलताना सांगितले की, काही  शासकीय प्रकल्प प्रलंबित आहेत. ते लवकरात लवकर राज्य शासनाने रायगड जिल्ह्याला प्राधान्य देऊन पूर्ण करावीत अशी मागणी केली. तसेच महाड, पोलादपूर,माणगांव विधानसभा आ. भरत गोगावले यांनी कुंभे जल प्रकल्प व पन्हाळघर धरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे आणि तेथील नागरिकांचा पुनर्वसनाचा तिढा देखील सोडवावा अशी विनंती केली. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद आ. अनिकेत तटकरे यांनी महाड येथील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. खा. सुनिल तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, या जलसंपदा भवनाचे काम ना.जयंत पाटील यांच्या सहकार्यानेच पूर्ण झाले. ते पुढे म्हणाले  माणगांव शहराशी माझे अतूट नाते आहे. माणगांव शहरात काळ नदीवर माणगांवकरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी बंधारा होणे गरजेचे आहे. तसेच माणगांव शहरातून जो १ किमी अंतराचा कालवा गेलेला आहे त्याची सुद्धा दुरुस्ती होणे गरजेचे आहे. कोकणातील पाणी हे इतरत्र न वळवता फक्त कोकणामध्येच पाण्याचे योग्य पद्धतीने विस्तार, वाटप व संधारण व्हावे. खा. शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे कोकणाच कॅलिफोर्निया कस करता येईल यावर जास्तीत जास्त भर देऊन कोकणाला प्रगती पथावर कसे नेता येईल याचा पुरेपूर प्रयत्न प्रामाणिकपणे करणार असल्याचे खा. सुनील तटकरे यांनी सांगितले. 

पुढे महाराष्ट्र राज्य जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री यांनी बोलताना सांगितले की, कोकण विविधतेने नटलेला अपार निसर्ग सानिध्य लाभलेला व पर्यटनासाठी उत्तम असा महाराष्ट्रातील एक भाग आहे. जलसंपदा भवनाचे पूर्ण श्रेय हे खा. सुनील तटकरे यांनी जाते. खा. सुनिल तटकरे हे दुरदृष्टी नेते आहेत लोकांची व्यवस्था उत्तम रितीने व्हावी. अधिकारी व कर्मचारी वर्गाने लोकांचे प्रश्न लवकरातलव्कर सोडवावेत या उद्देशाने ही इमारत उभी केलेली आहे. खासदार सुनील तटकरे सारखा नेता आमच्या कडे असता तर अनेक प्रलंबित प्रश्नांना चालना दीली असती. राज्यात कोणी कितीही देव पाण्यात बुडवून ठेवले तरी महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल. महाविकास आघाडी सरकार मार्फत पुढील पंचवीस वर्ष प्रेरणा मिळेल असे काम घडेल.

अलिबागमधील सांबरखिंड प्रकल्प एक महिन्याच्या आत मार्गी लागेल. तसेच कुंभे जलप्रकल्प व पन्हळघर येथील बंधाराचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल. माणगांव शहरासाठी काळनदीवर उत्तम नियोजन करून पर्यावरणाच्या दृष्टीने सोयीस्कर असा बंधारा बांधण्यात येण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच शहरातील कालव्याचे अंतर्गत पाईप टाकून किंवा बांधकाम करून दुरुस्तीसुद्धा करण्यात येईल. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी दिवेआगर व हरिहरेश्वर आले असतानाच्या आठवणींना सुद्धा उजाळा  दिला. दिल्लीत बसलेल्या सरकारने शेतकऱ्यांसोबत कामगारांची देखील हेळसांड केली ही पंतप्रधानांची जनतेवरील कृपा आहे का असा टोला देखील त्यांनी लगावला. शेतकऱ्यांविरुद्ध कायदे आणून शेतकऱ्यांना दिल्ली दरबारी न्यायासाठी कित्येक दिवस झाले लढा दयावा लागत आहेत. त्यावर  केंद्र सरकार काहीही बोलायला तयार नाहीत. कायमस्वरूपी कामगारांना कंत्राटी करण्याचा डाव आखून कामगारांवर सुद्धा अन्याय केलेला आहे.  एवढ्या वर्षात कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला नाही. तेवढा अन्याय ह्या केंद्र  सरकारने केलेला आहे. कामगारांचे कायदे शिथिल करून कामगार संघटना मोडीत काढलेल्या आहेत. ३०० पेक्षा कमी कामगार असलेल्या कंपनीतून एखादा कामगार काढला तरी आता प्रश्न विचारायला कोणी जाऊ शकत नाही.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा राज्याचा गाढा उत्तमरित्या सांभाळत आहेत. खा. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणला अजून कसे समृद्ध करता येईल यावर राज्य सरकार भर देत आहे. 

या लोकार्पण सोहळ्याला रा. कॉ. जिल्हा अध्यक्ष सुरेश लाड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा परिषद सभापती, माणगांव पं. स. सभापती अल्का जाधव, माणगांव नगरपंचायत नगराध्यक्षा योगिता चव्हाण, महाड, पोलादपूर, माणगांव विधानसभा अध्यक्ष बाबू खानविलकर,जलसंपदा विभाग काेकणप्रदेश मुख्य अभियंता संताेष तिरमणवार,व कार्यकारी संचालक काेकण पाटबंधारे विकास महामंडळ ठाणे श्री माटे व अधीक्षक अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता राकेश धाकतोडे, भंडारपाल शिरीष गोरेगावकर जलसंपदा विभागाचे अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या