सिंहगड पोलीसांकडुन उल्लेखनिय कामगिरी, सराईत वाहन चोरांस अटक करुन चोरीच्या ०५ दुचाकी हस्तगत

 





 *सिंहगड पोलीसांकडुन उल्लेखनिय कामगिरी, सराईत वाहन चोरांस अटक करुन चोरीच्या ०५ दुचाकी हस्तगत*


सदर बाबत अधिक माहिती अशी की सिंहगड पो स्टे कडील तपास पथकातील अधिकारी /कर्मचारी पो स्टे हृददीत चाहनचोरीस प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून गस्तीवर असतांना पोलीस हवालदार आबा अत्तेकर ब नं १६१५ यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, ब्रम्हा हॉटेल चौक, सिंहगड रोड, वडगाव बु पुणे येथे एक इसम चोरीची हिरो होन्डा सी डी १०० मोटारसायकल घेवून येणार असल्याची माहीती मिळाली सदर बातमी पो स्टे चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक घेवारे सरांना कळवून त्यांचे सूचनेप्रमाणे सर्व स्टाफ ब्रम्हा हॉटेल चौक, सिंहगड रोड, वडगाव बु येथे थांबला असता एक संशयीत इसम हिरो होन्डा सी डी १०० दुचाकी वरुन येतांना दिसला सदर गाडीचे नंबर प्लेट संशय आल्याने सदर इसमाला थांबण्याचा इशारा दिला असता तो न थांबता निघुन जाण्याचा प्रयत्न करीत असतांना स्टाफचे मदतीने त्यास थांबवुन त्यांची नाव पता विचारता त्यांने *आपले नाव १) साबीर इस्लामउददील अलम वय १९ वर्षे रा अमन चव्हाण आळी खोली नं १५ नव्हे धायरी रोड नहे पुणे* असे सांगीतले. सदर इसमाकडे अधिक चौकशी करता त्याने सदरची गाडी नवले ब्रिज नरहे येथुन चोरली असल्याची कबुली दिली. त्याप्रमाणे त्याच्याकडे अधिक तपास करता नमुद आरोपीनी सिंहगड रोड, कोंढवा पोलीस ठाणे हददीतुन दुचाकी वाहने चोरल्याची कबुली दिल्याने *त्याचेकडुन चोरीस गेलेली एकूण पाच मोटारसायकल वाहने असा एकूण १.५०,००० रूपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे* उघडकीस आलेली गुन्हांची माहिती पुडिलप्रमाणे


*१. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गुर नं १०/२०२१ भा द वी कलम ३७९* 


*२. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु र नं १५/२०२१ भा द वी कलम ३७९*



 *३. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु र न ३१/२०२१ मा द वी कलम ३७९*


 *४. सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु र नं ४०/२०२१ भा द यी कलम ३७९*


 *५. कोंढवा पोलीस स्टेशन गु र नं १२४१/२०२१ भा द वी कलम ३७९*


सदरची कामगिरी मा, डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. पोर्णिमा गायकवाड मॅडम - पोलीस उप-आयुक्त, परीमंडळ ३, मा, पी डी राठोड, - सहा पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.देवीदास घेवारे - वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगडरोड पो.स्टे, मा. प्रमोद वाघमारे, पोलीस निरीक्षक गुन्हे, सपोनि चेतन थोरबोले, पोउपनि कुलदीप संकपाळ, पोलीस कर्मचारी मोहन भुरुक, आबा उत्तेकर, राजेश गोसावी, शंकर कुंभार, उजवल मोकाशी,सचिन माळवे, दयानंद तेलंगेपाटील,धनाजी धोत्रे, अविनाश कोंडे, निलेश कुलये, किशोर शिंदे, रफिक नदाफ, सागर भोसले यांचे पथकाने केली आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या