पिंपरी (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेबांचे महान विचार आणि संविधानातील तत्व अंगिकारत आंबेडकरी जनतेने प्रखर संघर्ष करून आपल्या न्याय हक्काच्या लढ्यासाठी निळ्या निशान्याखाली एकत्र यावे असे आवाहन आरपीआयचे (ए) प्रदेश महासचिव बाळासाहेब भागवत यांनी वाकड येथे केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने म्हातोबा नगर येथिल नवीन शाखा उदघाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष सुरेश निकाळजे, युवकाध्यक्ष कुणाल वाव्हळकर, पश्चिम महाप्रदेश कार्याध्यक्ष निलेश आल्हाट, अल्पसंख्यकचे ख्वाजाभाई शेख, ऐम्प्लॉइज फेडरेशनचे विनोद चांदमारे, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुजित कांबळे आदी मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भागवत पुढे म्हणाले आगामी महापालिका निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून उत्तम मोर्चेबांधणी करा, शहरात आपण ४० जागा लढणार आहोत. तळागाळातील सर्व सामान्यांना बरोबर घेऊन संघटना वाढीसाठी अहोरात्र झटणार असल्याचे कुणाल वाव्हळकर म्हणाले. सामाजिक कार्यातून राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांचे हात बळकट करन्याचा यावेळी निर्धार करण्यात आला. मीना वाव्हळकर यांनी कार्यकर्ता कसा पाहिजे याचा आरसा दाखविणारे गीत सादर केेले. यावेळी प्रभाग २४ च्या युवक अध्यक्षपदी सचिन अडागळे, महीला अध्यक्षपदी अनिता शिंदे, वरिष्ठ आघाडी अध्यक्षपदी तुकाराम मकासरे यांची निवड करण्यात आली.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.


0 टिप्पण्या