पिंपरी-चिंचवड प्राधिकारणातील महावितरण कार्यालयात गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

 

पिंपरी (प्रतिनिधी) : महावितरण प्राधिकरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता मिलिंद चौधरी कधीही उपलब्ध नसल्याने त्याविरोधात पिंपरी चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ने गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.त्यांच्या खुर्चीवर पुष्पगुच्छ ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्यांनतर संबंधित अधिकाऱ्याला पुष्पगुच्छ देऊन कामकाजात सुधारणा करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आल्याची माहिती असोसिएशन ने दिली आहे.

प्राधिकरण उपविभागीय कार्यालयात सकाळच्या सत्रात ज्यावेळी विज ग्राहक आणि अन्य नागरिकांच्या समस्या सोडवायला अधिकारी उपलब्ध असणे अपेक्षित असताना गेली अनेक महिने अधिकारी जागेवर नसल्याच्या तक्रारी आहेत.त्यानुसार गुरुवारीही संबंधित अधिकारी कार्यालयात नव्हते आणि त्यानंतर असोसिएशन ने ही बाब वरिष्ठ कार्यालयाच्या नजरेत आणून दिली.गांधीगिरी मार्गाचा अवलंब करत पुष्पगुच्छ अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर ठेवत आंदोलन केले गेले.संबंधित अधिकाऱ्याला याची माहिती मिळताच ते कार्यालयात आले आणि नंतर तोच पुष्पगुच्छ त्यांना देऊन कामकाजात सुधारणा करून नागरिकांच्या समस्या सोडवा अशी विनंती संघटना पदाधिकाऱ्यांनी यावेळी केली.पिंपरी आणि भोसरी विभागाच्या समस्या सोडविण्यासाठी एक बैठक लावण्याची मागणी यावेळी  अंकुश नाळे प्रादेशिक संचालकांना सूचित करून करण्यात आली ज्यावर लवकरच अशी बैठक लावण्याचे आश्वासन प्रादेशिक संचालकांनी दिले.यावेळी संघटना अध्यक्ष गिरीश बक्षी,कार्याध्यक्ष संतोष सौंदणकर,सचिव नितीन बोंडे, संजीव पाटील, सुनिल पवार, नटराज बोबडे,महेश माने आदी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या