चिंचवड : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कर्तव्यावर तत्पर , सर्व सामान्य नागरिकांना दिलासा

 


चिंचवड : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कर्तव्यावर तत्पर

सर्व सामान्य नागरिकांना मिळतोय दिलासा


चिंचवड : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश कर्तव्यावर तत्पर

सर्व सामान्य नागरिकांना दिलासा

सर्वसामान्य नागरिकांच्या व्यथा व वेदना जाणून घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त नेहमीच तत्पर असल्याचे वास्तव त्यांच्या कार्य पद्धतीने दाखवून दिले आहे.पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी थेट आयुक्तांना सांगण्यासाठी आयुक्तालयात नागरीकांच्या रांगा लागत असल्याचे दिसत आहे.सर्वांना न्याय देता यावा या साठी वेळेची बंधने न ठेवठा आयुक्त तक्रारदाराचे गाऱ्हाणे आदरपूर्वक ऐकण्यासाठी तत्पर असल्याने समाजात पोलीस खात्याची प्रतिमा उंचावत आहे.
आपल्या अनोख्या पद्धतीने कामाची शिस्त  दाखविणारे पोलीस आयुक्त अल्पावधीतच शहरातील नागरिकांसाठी देवदूत बनले आहेत.खाकी चा सन्मान व्हावा व नागरिकांमध्ये भयमुक्त जीवन शैली रहावी यासाठी विविध उपक्रमातून थेट नागरिकांशी संवाद व चर्चा करण्याचा धडाका सध्या सुरू आहे.शहरातील गुन्हेगारी मोडीत काढत अवैद्य धंदे समूळ नष्ट करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्त केली आहे.याच बरोबर आपल्या कर्तव्याबाबत हलगर्जी पणा करणाऱ्या पोलीस अधिकार्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याने आता पोलीस दलातही शिस्तबद्धता आली आहे.
सामाजिक सुरक्षा पथकाच्या माध्यमातून शहरातील अवैद्य धंदे उध्वस्त करण्याचे काम सध्या जोमात सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत.कोणत्याही दबावाला न जुमानता कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची पद्धती नागरिकांच्या मनात घट्ट रुजत आहे.प्रत्येकला त्यांच्या कार्य पद्धती बाबत विश्वास निर्माण होत आहे.पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या स्थापने नंतर शहरातील नगरिकांना कृष्ण प्रकाश यांच्या कार्यपद्धती मुळे जनजागृती व आपल्या कर्तव्याची जाणीव होत आहे.

ताब्याची कामे कधी पासून करताय ?
शहरातील नागरिक पोलीस स्टेशनमध्ये न्याय मिळत नसल्याने थेट आता आयुक्तांना भेटत आहेत.दोन दिवसांपूर्वी एक महिला तक्रार दाराने आपल्याला काही जण धमकावत असून घर खाली करण्यासाठी दबाव टाकत असल्याची तक्रार केली.स्थानिक पोलीस स्टेशनचे एक अधिकारी संगनमत करून घर खाली करण्यासाठी आम्हाला कायद्याचा धाक दाखवत असल्याचे या महिलेने आयुक्तांना सांगताच आयुक्तांनी थेट संबंधित अधिकाऱ्यांला संपर्क करून आपण ताबा देण्याचे काम कधी पासून करत आहात हे विचारात त्या अधिकाऱ्याला फैलावर घेतले. आयुक्तांची भूमिका पाहणाऱ्या इतर नागरिकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या कार्य पद्धतीचा अभिमान वाटत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करताना आयुक्त थेट माहिती घेऊन समोरासमोर खरे-खोटे करत असल्याने पोलीस स्टेशन मधील कार्य पद्धती आता उघड होत आहे.

नागरिकांशी थेट संवाद :
आयुक्तांना भेटण्यासाठी अनेक नागरिक कार्यालयात येत असतात.प्रत्येकाला वेळ देऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात.आयुक्तालयात नगरिकांची झालेली गर्दी पाहून आयुक्तांनी प्रवेश द्वारावर उभे रहात नागरीकांच्या समस्या जाणून घेत होते.नागरिकांना जास्त वेळ वाट पाहावी लागू नये यासाठी त्यांनी सर्वांना आपला वेळ देत चर्चा करीत असल्याचे पाहून इतर अधिकारी व कर्मचारी आश्चर्य चकीत झाले होते.मात्र आपल्या कर्तव्यावर ठाम असलेल्या आयुक्तांनी प्रत्येकाला माझी भेट घेता येईल असे सांगितले आहे.त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे पोलीस खात्याची प्रतिमा उंचावत असून नागरिकांना पोलिसांविषयी आत्मीयता निर्माण होत आहे.शहरात नागरिक व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना राबविणाऱ्या आयुक्तांचा मोठा फॉलोअर्स ग्रुप तयार झाला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या