पुणे ग्रामीण कुडो असोसिएशन अध्यक्ष पदी मा. सुहास धाईंजे सर यांची अरविंद मोरे (प्रमुख - पुणे जिल्हा कुडो असोसिएशन) यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली
*मा. सुहास सरांचा परिचय*
नमस्कार
मी सुहास राहुल धाईंजे
सोलापूर जिल्ह्यामधील माळशिरस तालुक्यातील जाधवाडी या ग्रामीण भागातील रहिवासी असून मी माझे शिक्षण इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून इंजिनीअरिंग करून सध्या देहुगाव पुणे या ठिकाणी खाजगी शिक्षण संस्थेवर क्रीडाशिक्षक म्हणून जॉब करत आहे.
बरेच लोक मला विचारतात सर इंजिीअरिंग करून स्पोर्ट मध्ये कस काय ?
तर माझं मार्शल आर्टचे प्रशिक्षण गावाकडेच म्हणजे माझे मार्गदर्शक शिक्षक माननीय सर्जेराव पोतलकर सर यांच्याकडे ब्लॅक बेल्ट पर्यंत च प्रशिक्षण पूर्ण करून गेल्या दहा वर्षापासून मुला-मुलींना मार्शल आर्ट ट्रेनिंग देतो आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी मी व माझे पूर्ण टीम च्या माध्यमातून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा हेतू समोर ठेवून एक हजार मुलींना मोफत प्रशिक्षण देण्याचा विचार करून तो पूर्णत्वास नेला मला माझ्या प्रशिक्षण काळात स्कूल गेम्स वगैरे खेळण्याची संधी मिळाली नाही पण आज त्या संधी उपलब्ध आहेत आपल्या माध्यमातून मुला-मुलींना त्या संधी उपलब्ध करून देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो आहे सध्या माझ्या टीम मध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे विद्यार्थी आहेत आपणा सर्वांना माहित आहे सर्वच प्रशिक्षकांचे उराशी बाळगलेले स्वप्न असतं ते म्हणजे माझा विद्यार्थी माझा मुलगा/ मुलगी ऑलम्पिक स्पर्धे मध्ये दिसावा व त्याने देशासाठी गोल्ड मेडल मिळवून आपल्या देशाचं नाव मोठं करावं मी ही हेच स्वप्न उराशी बाळगून आहे. हे माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करतो आहे मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहीन.
मी अरविंद मोरे सर व जस्मिन मकवना सर यांना धन्यवाद देऊ इच्छितो त्यांनी मला माझ्या मुला/मुलींना स्कूल गेम्स खेळण्यासाठी एक मार्ग मोकळा करून दिला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.


0 टिप्पण्या