जळगाव पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील चुंचाळे गावाजवळ चोपडा शहर पोलिसांनी दोन संशयितांकडून सात देशी कट्टे जप्त केले आहे.या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातून काही संशयित अवैध शस्त्र घेऊन येत आहे अशी माहिती मिळताच चोपडा शहर पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच ते पोपटा सारखे बोलू लागले व त्यांच्याजवळील गावठी बनावटीचे सात कट्टे काढून दिले. सदर कारवाईत पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. विलेश सोनवणे संतोष पारधी आदींनी कामगिरी करत चोपडा शहर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे यांचेही कौतुक....
गुन्हेगारी व अवैध धंद्यावर जरब बसावा या करिता कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्यामुळे पोलीस यंत्रणा वेगाने कामाला लागली असून त्यामुळे पोलिस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांचे ही सर्वत्र कौतुक होत आहे त्याबद्दल त्यांना पोलीस प्रवाह न्युज परिवारातर्फ अभिनंदन.
जळगाव प्रतिनिधी जितेंद्र चौधरी
मोबाईल क्रमांक-9421520499
पोलीस प्रवाह न्युज



0 टिप्पण्या