हुतात्मा वीर भाई कोतवाल व्यायाम मंदिर व मैदान बचावावे यासाठी रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाचा तहसीलदार यांना निवेदन.

पोलीस प्रवाह न्यूज़ रायगड

रायगड: दि. २२- कर्जत मधील हुतात्मा वीर भाई कोतवाल व्यायाम मंदिर व मैदान बचावाचे या साठी निवेदन तहसीलदार  यांना दिले. यावेळी  जिल्हा अध्यक्ष  सुदाम शिंदे, कार्याध्यक्ष  रवींद्र देवकर, विश्वस्त दत्तात्रेय पांडे, यशवंत खराडे, कोषाध्यक्ष सुरेंद्र पालांडे, अरुण शिंदे पेण  रसाळ उरण तालुक्यातील प्रदीप शिंदे बबन सकपाळ, प्रकाश जळगावकर, मंगेश देवकर,  कर्जत तालुकाध्यक्ष दिलीप शिंदे सचिव रघुनाथ विभार , कर्जत शहर अध्यक्ष राकेश डगळे , सचिव विशाल कोकरे , कर्जत  मधील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

त्यानंतर कशेले येथे सत्कार समारंभ व सभा संपन्न झाली. त्यावेळेस रायगड जिल्हा नाभिक तरूण संघाचे अध्यक्ष सुदाम शिंदे यांनी  संघटण कौशल्य, प्रबोधन, महिला, सबलीकरण  जेष्ठ नागरीक शासकीय सुविधा, सलून कारागीरांना व्यवसाय कौशल्य यावर मार्गदर्शन  केले.  संघर्ष समितीचे वकील  जोशी यांनी सभेला मार्गदर्शन करून संघर्ष कोणत्या प्रकारे करावा असे सांगितले.  संघटनेचे  सल्लागार  यशवंत  जाधव, विश्वस्त दत्ताञेय पांडे आणि  यशवंत खराडे यांनी बहुमोल विचार मांडले. सभेचे सुञसंचालन  लवाद कमिटी उपाध्यक्ष व कर्जत तालुका सचिव विभार सर यांनी ऊत्तम प्रकारे केले. मान्यवरांनी समाजाला मार्गदर्शन केले. बहुसंखेने समाज बांधव उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या