रात्रीच्या गस्त साठी शांतता कमिटीचे सदस्य सज्ज ,पोलीस आयुक्तांचा उपक्रम

 


पिंपरी (प्रतिनिधी) : शहरात कायदा सुव्यवस्था सुरळीत रहावी यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड विविध उपक्रम हाती घेतले आहेत.रात्री होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला पोलीस स्टेशन हद्दीतील शांतता कमिटीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.या उपक्रमासाठी चिंचवड पोलीस स्टेशनच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे.

 रात्र गस्त उपक्रमासाठी चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे,पोलीस निरीक्षक विश्वाजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीचे सदस्य योगदान देत आहेत.या उपक्रमात सहभागी झालेल्या सदस्यांना खुळे व पोलीस उपनिरीक्षक ठुबल यांनी मार्गदर्शन केले. गस्त देते वेळी घ्यावयाची काळजी व आपली जबाबदारी याबाबत माहिती दिली.

 शांतता कमिटी सदस्य आणि प्रांत पोलिस संघाचे चे सदस्य यांनी चिंचवड पोलिस स्टेशन चे हद्दी मध्ये रात्र गस्त  उपक्रम राबवला.गस्त करणाऱ्या सदस्यांची विचारपुस करण्यासाठी पोलिस उपायुक्त मंचक इपर यांनी भेट दिली.सदस्यांनी आपले अनुभव सांगितले. गस्तीवरील  पोलिस कर्मचारी अत्यंत निष्ठेने श्रध्देने आणि कर्तव्य दक्षतेने त्यांचे कर्तव्य पार पाडत असल्याचा अनुभव यावेळी सांगण्यात आला.रात्री फिरणाऱ्या संशयास्पद व्यक्तींची विचारपूस करण्यात आली.

प्रत्येक पोलीस स्टेशच्या हद्दीत असे उपक्रम राबविले जाणार असल्याचे इप्पर यांनी सांगितले.पोलिसांच्या मदतीला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. या मुळे रात्रीच्या वेळी होणारे गुन्हे कमी होऊ शकतील व कायदा सुव्यवस्था सुरळीत होईल असे त्यांनी सांगितले.चिंचवड मधील रात्र गस्त उपक्रमात सुभाष मालुसरे, धनंजय कुलकर्णी,सतीश भारती ,गोपाळ बिरारी , सुशील मालुसरे, प्रशांत शेणॉय यांनी सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या