नवीन पाण्याची टाकी उभारण्याची मागणी
आयुक्तांना दिले निवेदन
पिंपरी (प्रतिनिधी) : चिंचवड गावातील प्रभाग क्रमांक 18 मधील पाणी पुरवठा कमी दाबाने व योग्य प्रमाणात होत नसल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करीत आहेत.येथील समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नगरसेवक राजेंद्र गावडे यांनी पाणी पुरवठा विभागाशी चर्चा केली.तांत्रिक अडचणी विचारात घेऊन नवीन पाण्याची टाकी उभारण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त श्रवण हार्डीकर यांच्या कडे केली आहे.
सध्या चिंचवड गावात होणारा पाणी पुरवठा हा ब प्रभाग क्षेत्रीय कार्यालया जवळ असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून होत आहे.मात्र येथून प्रभाग 19 साठी सुद्धा पाणी पुरवले जात असल्याने नागरिकांना योग्य दाबाने व मुबलक पाणी मिळत नाही.येथील तंत्रिक अडचणी लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने केशवनगर मधील आरक्षण क्रमांक 233 मधील शाळा व क्रीडांगण सोडून असलेली जागा महापालिकेच्या ताब्यात आहे.
या जागेवर नवीन पाण्याची टाकी उभारल्यास नागरिकांच्या पाण्याच्या समस्या सुटणार आहेत.या बाबत योग्य विचार करून निर्णय घ्यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.



0 टिप्पण्या