पोलीस प्रवाह न्यूज़
रायगड : दि १ - राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड जिल्हा आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते मंगळवार दि. ०१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी. १०.०० वा. उप जिल्हा रूग्णालय, माणगांव येथे फिरता दवाखाना (मोबाईल व्हॅनचे) उदघाटन व एक्स-रे मशिनचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महाड पोलादपूरचे आमदार भरतशेट गोगावले माणगांवच्या प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर तहसिलदार ललिता बाबर जिल्हाशल्य चिकित्सक डाॅ. सुहास माने तसेच नगराध्यक्षा योगिता चव्हाण उपनगराध्यक्ष दिलीप जाधव तसेच राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी व पत्रकारांची उपस्थिती लक्षणिय होती.
याप्रसंगी प्रसार माध्यंमाशी बोलताना आदिती तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनातून एचडीएफसी च्या माध्यमातून त्यांच्या सिएसआर फंडातून या मोबाईल मेडिकल व्हॅन, ईसीजी तसेच एक्सरे मशिन उपजिल्हा रुग्णालयास उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहीती दिली कोव्हीडच्या कालावधीत माणगांवचे उपजिल्हा रुग्णालयास अत्याधुनिक सेवा सुविधा मिळाव्यात यासाठीच आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
तसेच कोव्हिड सोडून इतर ही रोगांची अत्याधुनिक तपासणी आपल्या इकडे व्हावी या सुविधांमुळे दिवसाला दिडशे ते दोनशे रुग्णांची तपासणी अतिशय योग्य रितीने करता येईल अशा या अत्याधुनिक सुविधांचा लाभ जनतेला मिळणार आहे. कारण केवळ माणगांवच नव्हे तर इतर तालुक्यातूनही अगदी म्हसळा, श्रीवर्धन, तळा, रोहा, सुधागड, महाड, पोलादपूर या ठिकाणाहून माणगांवला उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्याचा लाभ होईल असे सांगितले.
आरोग्याकडे आरोग्य विभागाकडे कुठल्याही परिस्थितीत दुर्लक्ष होता कामा नये अशा महाविकास आघाडीचे आमचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आम्हां सर्वांना सक्त सूचना असल्याचेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले तसेच खासदार सुनिल तटकरे आमदार भरतशेट गोगावले व लोकप्रतिनीधी म्हणुन मी स्वतः आरोग्य सुविधांसाठी दुर्लक्ष होणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करु असा विश्वास माणगांवकरांना दिला.




0 टिप्पण्या