चापेकर चौकाचे विद्रुपीकरण, सुशोभीकरणाचे काम रखडले
चिंचवड: ऐतिहासिक चौक अशी ओळख असणारा चिंचवड गावातील क्रांतिवीर चापेकर चौक बकाल झाला आहे.उड्डाण पुलाखालील मोकळ्या जागेचे रखडकेले सुशोभीकरण,मद्यपींचा वावर,अनाधिकृत पार्किंग व जाहिरातीचे फलक, चिटकविलेले पोस्टर या मुळे चौकाची दुरावस्था झाली आहे.
महत्वपूर्ण घडामोडींची साक्ष देणारा हा चौक सध्या अनेक समस्यांनी ग्रासला आहे.उड्डाण पुला झाली मोकळ्या जागा सुशोभिकारणा साठी ठेवल्या आहेत.मात्र हे काम रखडल्याने या ठिकाणी मद्यपी,भटकी कुत्री झोपलेली दिसतात. उड्डाण पुलाचे खांब व भिंतीवर अनाधिकृत फ्लेक्स, पोस्टर लाावले जात असल्याने हा भाग खराब झाला आहे.चौकालगत असणाऱ्या मोकळ्या जागेत.भंगाराच्या वस्तू पडल्या आहेत.येथील जागेत घोड्यांचे तबेले बनविले आहेत.
या भागात नो पर्किंगचे फलक लावले आहेत.मात्र याच फलकाभोवती वाहने उभी केली जातात.अनेकांनी चौकात आपल्या व्यवसायाच्या जागा निश्चित केल्या आहेत.खाजगी वाहनांचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी पार्किंग व्यवस्था 'हम कारे सो कायदा' या पद्धतीने ठरविली आहे.येथील वाहतूक समस्या विचारात घेऊन येथे वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले.मात्र ते नेहमीच बंद असल्याने ते आता शोभेचे झाले आहेत.
छोट्या -मोठया व्यावसायिकांनी येथील जागा गिळंकृत केल्या आहेत.या मुळे वाहतूक समस्या गंभीर झाली आहे.
मोरया गोसावी समाधी मंदिरात अनेक बाहेरगावचे भाविक दर्शनासाठी येत असतात.त्यांना या बकाल चौकाचे दर्शन घडावे हि खरी शोकांतिका आहे.येथील सुशोभिकारणाचे काम त्वरीत सुरु करावे तसेच परिसरातील अनाधिकृत फलक,पार्किंग व राडारोडा हटवावा व येथील समस्या मार्गी लावून चौकाचे सुुशोभीकरण करावे अशी नागरिकांची मागणी आहे.

0 टिप्पण्या