चिंचवड - करोना कालावधीत महामंडळाकडून ऑनलाईन चित्रकला स्पर्धा व ऑनलाइन जनरल नॉलेज स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण शुक्रवार दिनांक सहा नोव्हेंबर 2020 रोजी एस एन बी पी स्कूल मोरवाडी याठिकाणी घेण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून भरत सुरसे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण महामंडळ तसेच विजया फर्नांडिस प्राचार्या /संस्थापिका होली मिशन स्कूल तसेच मुकेश तीलवानी डायरेक्टर अकॅडमिक हाइट्स पब्लिक स्कूल तसेच महामंडळाकडुन उपाध्यक्षा मृदुला महाजन समन्वयक निवृत्ती काळभोर कार्याध्यक्ष रफीक इनामदार महिला प्रतिनिधी सुजाता चव्हाण आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव फपाळ यांनी केले तर प्रास्ताविक रफिक इनामदार यांनी केली.
ऑनलाईन चिञकला स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या.लहान गट व मोठा गट याप्रमाणे स्पर्धा घेण्यात आल्या.स्पर्धेत 95 शाळेतील 875 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. बक्षिसाचे स्वरूप लहान व मोठ्या गटाकरिता प्रथम क्रमांक 2001, द्वितीय क्रमांक 1501, तृतीय क्रमांक 1001 आणि उत्तेजनार्थ 501 याप्रमाणे रोख रक्कम ट्रॉफी व प्रमाणपत्र याप्रमाणे होते. कार्यक्रमांमध्ये सदर बक्षिसाचे वितरण करण्यात आले विशेष म्हणजे प्रत्येक गटात उत्तेजनार्थ पाच बक्षिसे देण्यात आली. अशी एकूण 16 विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
शहरातील क्रीडा शिक्षकांकरिता करोना कालावधीत ऑनलाइन जनरल नॉलेज स्पर्धा घेण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत 46शिक्षकानी सहभाग घेतला होता त्यातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र व ट्राफि चे वितरण करण्यात आले जनरल नॉलेजच्या एकूण ऑनलाइन तीन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना भरत सुरसे यांनी खासकरून पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे सुद्धा अभिनंदन केले मुलांमध्ये मुक्तछंद जोपासण्याची आवड निर्माण करण्याचे काम पालकच करू शकतात असे ते म्हणाले तर विजया फर्नांडिस यांनी छंद कसे जोपासावेत याबाबत मार्गदर्शन केले तर मुकेश अंबानी यांनी विद्यार्थ्यांना नवीन छंद जोपासण्यासाठी पालकांनी प्रोत्साहित केले पाहिजे असे ते म्हणाले .अध्यक्षीय भाषणात फिरोज शेख यांनी महामंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले याशिवाय गुणवत्ते बरोबर सर्वांगीण व्यक्तिमत्व निर्माण होणे अपेक्षित आहे असेही ते म्हणाले.
महामंडळाने वर्षभरामध्ये तब्बल 50 च्या वर नवनवीन उपक्रम राबवले आहेत. खेळांच्या स्पर्धेपासून ते शिक्षकांचे पुरस्कार ऑनलाईन स्पर्धा यासारखे अनेक उपक्रम राबवलेले आहेत.
कार्यक्रमाच्या शेवटी श्री निवृत्ती काळभोर यांनी सर्वांचे आभार मानले.



0 टिप्पण्या