कामेरकर हॉस्पिटलचे एक पाऊल चॅरिटीसाठी- डॉ. संतोष कामेरकर.

प्रतिनिधी- रुपेश पोवार


रायगड : दि . ५ - संपूर्ण माणगांव तालुक्यात सुप्रसिद्ध असलेले कामेरकर हॉस्पिटल  वर्षानुवर्षे रुग्णांची सेवा करीत आहे. अनेक मोठ मोठी शस्त्रक्रिया, अनेक रोगांवर उपाय, विविध प्रकारचे रुग्ण कामेरकर हॉस्पिटलममध्ये उपचार घेऊन बरे झालेले आहेत. संपूर्ण जगाला कोरोना सारख्या महामारीने अगदी सळो की पळो करून सोडले. अनेक जणांचे यात रोजगार बुडाले. अनेक जणांचा उदनिर्वाह आता मोठ्या कठीणाईने होत आहे. यामुळे कामेरकर हॉस्पिटलने याचा विचार करिता पहिले पाऊल चॅरिटीसाठी या ५ नोव्हेंबर रोजी टाकत असल्याचे डॉ. संतोष कामेरकर यानी सांगितले.

कामेरकर हॉस्पिटलमध्ये आता गर्भवती महिलांकरिता व गर्भाशयाचे शस्त्रक्रिया व जनरल शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात जनरल वॉर्ड( सर्वसाधारण कक्ष) येथे करणार असल्याची माहिती डॉ. संतोष कामेरकर यांनी दिली आहे. यामध्ये नॉर्मल डिलिव्हरी/प्रसूती, सिझेरियन, नसबंदी शस्त्रक्रिया, गर्भपिशवी संबंधी शस्त्रक्रिया तसेच जनरल सर्जरीमध्ये अँपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, अल्सरचे ऑपरेशन केले जाणार आहेत. डॉ. संतोष कामेरकर गेली ३५ वर्ष वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत. ते स्वतः एम. एस. सर्जन आहेत. तर  त्यांची मुलगी डॉ. सिद्धी कामेरकर या  एम. बी. बी.  एस. डी. जी.  ओ. असून त्यांनी दिड वर्ष उपजिल्हा रुग्णालय येथे काम केलेले असुन उपजिल्हा रुग्णालयात येणार्या गर्भवती महिलांना  उत्तम प्रकारे सेवा दिली असल्याचे रुग्णान कडून समजते .तसेच डॉ.कामेरकरान च्या पत्नी या सुद्धा बी. ए. एम. एस. आहेत. मुलगा सुद्धा एम. बी. बी.  एस. चे शिक्षण घेत असून संपूर्ण कुटुंब वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे त्याचा योग्य तो फायदा रुग्णांना होणार असल्याचे डॉ. संतोष कामेरकर यांनी सांगितले. 
 
डॉ.संतोष कामेरकर यानी गेली अनेक वर्ष उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांची सेवा केली असुन विंचू दंशचा एकही रुग्ण त्यांचा कडून दगावलेला नाही.  याची दखल घेत पोलीस प्रवाह च्या माध्यमातून डॉ. कामेरकर याना देवदुत या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालयात महिला ना उत्तम प्रकारे सेवा देणार्या डॉ. सिद्धी कामेरकर याना देखील महिला आदिश्री पुरस्कार मिळालेला आहे.

तसेच भविष्यात लॅप्रोस्कोपी (दुर्बीण) शस्त्रक्रिया ही करणार आहोत असे डॉ. सिद्धी कामेरकर यांनी सांगितले. तसेच आर्मी व पोलीस क्षेत्रात काम करत असलेल्यांना विशेष सवलतीत उपचार ही कामेरकर हॉस्पिटलमध्ये दिले जातात असे डॉ.सिद्धी कामेरकर यानी बोलताना सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या