वैभव सत्वे, प्रतिनिधी
रायगड : दि. १२ - रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या युवा जिल्हाध्यक्ष पदी समीर मारुती शिर्के यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात पार पडलेल्या रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमात समीर शिर्के यांची युवा जिल्हाध्यक्ष म्हणून निवडीची घोषणा रायगड जिल्हा अध्यक्ष सुदाम शिंदे यांनी केली. समीर शिर्के हे तळा येथील रहिवासी असून उच्चशिक्षित आहेत. त्यांचे वडील श्री. मारुती शिर्के गुरुजी यांनी रायगड जिल्हाध्यक्ष म्हणून ११ वर्ष समाजाचे काम पाहिले त्याचप्रमाणे सध्या विश्वस्त पदी कार्यरत आहेत. लहानपणापासून समाजकारण याची आवड असणारे समीर शिर्के यांनी वयाच्या १५ व्या वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली. वडिलांसोबत जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत सहभागी होणे, विविध कार्यक्रमात सहभागी होऊन सक्रिय सहभाग घेणे असे बाळकडू आपल्या वडिलांकडून घेतले. तळा तालुका अध्यक्ष, निवडणूक प्रक्रिया सचिव अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडल्या.
नाभिक समाजातील सलून मध्ये काम करणारे तरुण, विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी सरकारी योजनांचा लाभ करून देणे व योग्य प्रकारे व्यक्तिमत्व विकास साध्य करण्यास मदत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले. सदर प्रसंगी रोहा नगर परिषदेचे गटनेते महेंद्रजी दिवेकर, नगरसेवक समिरजी सकपाळ, विश्वस्त श्री. मारुती शिर्के गुरुजी, विश्वस्त श्री. दत्तात्रेय पांडे, रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. सुदाम शिंदे, सचिव डॉ. अनंत खराडे, कार्याध्यक्ष श्री. रवींद्र देवकर, महाराष्ट्र प्रदेश प्रतिनिधी बापू सोनगिरे , विलास यादव आदि समाज बा ंन्धव उपस्थीस्त होते. तसेच सर्व समाज बांधव महिला सदस्या मान्यवर उपस्थित सर्व जेष्ठ समाज बांधवांनी नवनिर्वाचित युवा जिल्हाध्यक्ष समीर शिर्के याना शुभेच्छा दिल्या.



0 टिप्पण्या