जमिनींचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी व पिकाच्या अधिक उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण गरजेचे - श्री. पडवळकर

माणगाव : दि १०- जमिनींचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी व पिकाच्या अधिक उत्पादन वाढीसाठी माती परीक्षण गरजेचे  असल्याचे   मंडळ कृषि अधिकारी श्री पडवळकर यांनी मृदचाचणी व एकात्मिक खत व्यवस्थापन पध्दती या विषयावर एकदिवसीय शेतकरी प्रशिक्षण   मौजे  वडपाले येथे करण्यात आले होते त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 या वेळी एकात्मिक खत व्यवस्थापन पध्दती या विषयावर मार्गदर्शन केले तर मृदचाचणी या विषयावर कृषी पर्यवेक्षक श्री. ससाणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेती संबंधीत विवीध योजनेचे व शेती पुरक योजनां विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित मंडळ कृषि अधिकारी पडवळकर, कृषी पर्यवेक्षक ससाने, कृषी विभागातील शिंदे, सुरडकर, राम कदम,  नलावडे, उगले, श्रीमती जगताप मॕडम तसेच वडपाले गावचे शेतकरी गणपत शिंदे, तानाजी शिंदे, गजानन शिंदे, बाबूराव शिंदे, अशोक शिंदे,अनंत शिंदे यांचेसह 50 ते 60 शेतकरी व महिला वर्ग  उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विभागाचे कृषी सहाय्यक मयुर कोळी यांनी केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या