कोल्हापूर - साके येथे नाविद मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त आडीच कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ

 

साके येथे रस्ते कामांचा शुभारंभ करतांना जि.प.सदस्य मनोज फराकटे,शेजारी बाळासाहेब तुरंबे,अशोक सातुसे,सी.बी.कांबळे,चंद्रकांत निऊंगरे आदी.  

छाया ः विनायक सातुसे,साके

कोल्हापूर प्रतिनिधी - विनायक सातुसे


साके ता. कागल ;-  प्रशस्त रस्ते गटारी,पाणी,लाईट इ.गोष्टींचा विकास गावच्या वेशीपर्यंत आला पण साके गावी काही आला नाही अशी खंत साके ग्रामस्थ करत होते.

      ग्रामविकासमंत्री मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष प्रयत्नातून साके येथील विकास कामांसाठी आडीच कोटी निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली आहे.साके गाव तालुक्यात विकासाचे आदर्शवत गाव म्हणून प्रसिद्ध होणार असून यामध्ये मुश्रीफांचे मोलाचे सहकार्य असल्याचे प्रतिपादन तालुका संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरंबे यांनी केले.त्याचबरोबर जनतेच्या आणि भैरी च्या आशीर्वादाने मुश्रीफ साहेब देखील कोरोना मुक्त झाले असुन होणारी गावात होणारी कामे हि उत्तम दर्जाची असावीत असे मनोगत व्यक्त केले.

साके ता.कागल येथे नाविद मुश्रीफांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित २ कोटी ४५ लाखाच्या विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य मनोज फराकटे होते. 

यावेळी प्राथमिक शाळा ते भैरवनाथ देवालय, साके - व्हनाळी रस्ता,जाधववाडी,दत्तमंदिर ते सावर्डे रस्ता आदी रस्ते कामांचा शुभारंभ जि.प.सदस्य मनोज फराकटे,बाळासाहेब तुरंबे,अशोक सातुसे,चंद्रकांत निऊंगरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

तसेच संताजी शुगरचे चेअरमन मा. नाविद मुश्रीफ यांचा वाढदिवसानिमित्त केक जि. प सदस्य मनोज फराकटे यांनी कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

  कार्यक्रमास सी.बी.कांबळे,बापूसो पाटील,मारूती निऊंगरे,अशोक सातुसे,अमीर नायकवडी,बाबुराव पाटील,विजय जाधव,दतात्रय ससे,राजू नायकवडी,तानाजी हरेल,संताजी शुगर कमर्चारी उपस्थीत होते.आभार इंजिनिअर अमीर नायकवडी यांनी मानले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या