जळगाव - भुसावळ बाजार पेठ पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

 



जळगाव जिल्यातिल भुसावळ येथे चाकुचा धाक दाखवून लूट केल्या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांतील पसार आरोपी ला ११महिन्यानंतर पकडण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.दिनांक २१ डिसेम्बर रोजी पहाटे साडेपाच वाजता सागर सुभाष बरगळ हे नाहटा चौफुली कडे पायी जात असतांना तीन अदन्यात इसमानी चाकुचा धाक दाखवत मारहाण करीत सहा हजार रुपये किमतीचा मोबाइल एक हजार सातशे रूपयांची रोकड लांबविली होती .या नंतर बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित लुकमान उर्फ लुक्का 

कादर शहा (२६,रा. दीनदयाल नगर भुसावळ) हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार होता. त्याचा शोध पथक घेत होते. संशयित हा भुसावळ येथे प्रीमियर हॉटेल जवळ आला असल्याची गुप्त माहीती मिळताच त्याच्या मुस्कया आवळण्यात आल्या आहे.


या पथकाने केली अटक


पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चद्रकांत गवळी ,उप पोलीस अधीक्षक कुमार चिंथा, बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनील गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश गोटला, किशोर महाजन, उमाकांत पाटिल, विकास सातदिवे, श्रीकृष्ण देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशात परदेसी, सचिन चौधरी, चेतन ढाकने, सुभाष साबळे या पथकाने संशयितास अटक केली. 


जळगाव जिल्हा प्रतिनिधि जितेंद्र चौधरी

मोबाइल क्रमांक 9421520499

पोलीस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या