महात्मा गांधी जयंती उपक्रम
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशु विहार प्राथमिक विद्यालय आकुर्डी पुणे ४४ या आपल्या विद्यालयात आपल्या विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार,शिकवण रुजवावेत या उद्देशानेआम्ही दरवर्षी आपले महान नेते,पुढारी यांची जयंती विविध स्पर्धा किंवा उपक्रम घेऊन साजरे करत असतो.शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ हे कोरोना या साथीच्या आजाराने संक्रमित असे वर्ष आहे त्यामुळे शाळा अजूनही ऑनलाईन पद्धतीनेच चालू आहेत.तेव्हा यावर्षी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती काळे योगिता प्रभाकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील
प्ले वर्ग ते इयत्ता चौथी पर्यंतच्या सर्व शिक्षकांनी शुक्रवार दिनांक २/१०/२०२० रोजी वक्तृत्व स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,चरखा बनवणे,फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा विविध स्पर्धा ऑनलाईन आयोजित केल्या होत्या.त्याला पालकांनी चांगला प्रतिसाद दिला.त्यातील काही निवडक स्पर्धकांचे व्हिडिओ व फोटो पुढीलप्रमाणे आहे.



0 टिप्पण्या