जळगावात पोलीस अधीक्षकपदी डॉ. प्रवीण मुंढे रुजू होताच ; 23 लाखांच्या टायर चोरी प्रकरणाचा केला पर्दाफाश.

 

जळगावचे  नवनियुक्त पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे

प्रतिनिधी - जळगाव 

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील लक्ष्मिनारायण पलोड यांच्या मालकीचे पलोड डिस्ट्रीब्यूटर नावाचे टायर चे गोडाउन फोडून 23लाख 20हजार 570 रूपयांचे टायर व रोकड चोरुन नेल्या प्रकरणी अनिल बिसाराम शिंदे (वय45 रा. तेरखेड़ा ता. वाशी जी.उस्मानाबाद) या मुख्य संशयितास जळगाव    स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफिने अटक केली आहे.दरम्यान या टोळीत आणखी  पाच ते सहा साथीदार असल्याचे निष्पन झाले असून त्यांच्या मागावर एक पथक कायम ठेवण्यात आले आहे. या बाबत अधिक माहीती अशी की मुख्य संशयित अनिल शिंदेसह त्याच्या टोळीतिल सदयस्यांचा ट्रॉन्सपोर्ट चा व्यवसाय आहे. त्यांच्या ट्रक ही आहेत. या ट्रक मधून माल वाहतूक करीत ते राज्य, परराज्यात फिरतात माल सोडल्यानंतर परतीच्या प्रवासात अशाच प्रकारे गोदाम फोडून चोरया करण्याची त्यांची पध्दत आहे. ही टोळी ८सेप्टेंबर रोजी जळगावात ट्रकमध्ये डाळ घेऊन आली. परत जात असतांना त्यांनी पाळधितिल गोडाउन फोडून टायर चोरी केले. त्यांच्यावर उस्मानाबाद येथेहि गुन्हे दाखल आहेत.


जळगाव पोलीस अधीक्षकांना मिळाली गुप्त माहिती


जळगाव जिल्ह्यात नव्याने रूजू झालेले पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना या प्रकरणी गुप्त माहिती मिळताच त्यांनी वेळ न गमवता उस्मानाबाद चे पोलीस अधीक्षक राजतिलक रौशन यांच्याशी संपर्क साधुन माहिती घेतली. व पुढील कार्रवाई साठी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला पथक नेमन्यास सांगितले.


जळगाव स्थानीय गुन्हे शाखेची मोठी कामगिरी


 दरम्यान या चोरी प्रकरणी संशयिताचे  जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी सायबरसेल च्या माध्यमातून संशयित मोहरक्याचे स्केच तयार करीत ते व्यायरल केले होते. या बाबत उस्मानाबाद जिल्यात धागेदोरे मिळताच सहायक पोलीस निरीक्षक स्वपनिल नाईक ,रामकृष्ण पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अशरफ शेख, अनिल देशमुख, इंद्रिस पठाण, विजय पाटील, नरेंद्र वारूले, यांचे पथक रवाना केले. व या पथकाने मोठ्या शिताफिने संशयित अनिल शिंदे यांस अटक करुन धरणगाव पोलीसांच्या ताब्यात दिले आहे .व त्याने गुन्हयाची कबुली ही दिली असून  त्यास ५दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.  


जळगाव जिल्हा प्रतिनिधि जितेंद्र चौधरी मोबाइल नंबर 9421520499 

पोलीस प्रवाह न्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या