गिरीश गोरेगावकर, प्रतिनिधी
माणगाव : दि - ४ मानवाधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्या कडून महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. शिवाजी पाटील व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष श्री. प्रविण हरी गायकवाड यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देउन श्री. मंदार चांदोरकर यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली असून सत्कार करण्यात आला .
यावेळी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री. रघूजी भोसले , कल्याण व डोंबिवली शहर उपाध्यक्ष श्री. कनैयाजी चौधरी , अरविंद आणि महाराष्ट्र महिला अध्यक्षा सौ. इंदू यादव मॅडम, ठाणे जिल्हा महिला सचिव श्रीमती भाग्यश्री गायकवाड मॅडम तसेच ठाणे जिल्हा महिला संघटक सौ. वैशाली सोनवणे मॅडम ठाणे ऑफिस येथे या सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थिती मध्ये शाल व फूल गुच्छ देऊन मंदार चांदोरकर यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी उपस्थित मान्यवरांनकडून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.



0 टिप्पण्या