पिंपरी चिंचवड - शारीरिक शिक्षण या विषयाचा प्राथमिक स्तरावर *" दिल्ली पँटर्न "* महाराष्ट्रात राबवावा.. - महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची मागणी

 



पिंपरी चिंचवड - अरविंद मोरे 

क्रीडा संपादक 


शिक्षण  व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक , मानसिक , बौद्धिक , सामाजिक विकासासाठी , व शिक्षण  घेण्यास सक्षम होण्यासाठी , सदृढ समाज निर्मिती, बलशाही भारतासाठी ,देशाच्या आर्थिक प्रगती साठी, आँलिम्पिंक मधील पदके वाढविण्यासाठी आणि  अत्यंत  महत्त्वाचे  म्हणजे  प्रत्येक  विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती  वाढविण्यासाठी " आरोग्य व शारीरिक  शिक्षण " विषयाची अत्यावश्यक गरज  झालेली  आहे, हे  संपूर्ण जग कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर "आरोग्य " या घटकावर अनुभव घेत आहे , म्हणून "आरोग्य  व शारीरिक  शिक्षण " आणि   शारीरिक शिक्षण शिक्षक यांच्या साठी *" दिल्ली  पँटर्न"* महाराष्ट्रात  राबविल्यास वरील वरील ध्येय पुर्ती होऊ शकते. .

 १) दिल्ली  प्रमाणे  प्राथमिक स्तरावर  पुर्ण वेळ physical education Teacher (B.P.Ed  )  आल्यास  महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शाळा *( जिल्हा परिषद) सह सर्व  नगर पालिका शाळा , महानगर पालिका शाळा* मध्ये  P.E.Teachers  यांची *दिल्लीत 423  पदे* आहेत  तर महाराष्ट्राच्या लोकसंख्या व शाळा यांचा विचार करता *आकडा प्रचंड मोठा* होऊ शकतो. 

२) *माध्यमिक स्तर* -  ( B.P.Ed. )  - *"शाळा तेथे शारीरिक  शि. शिक्षक"*  आणि  २५०  विद्यार्थी पाठीमागे *एक.शि. शि. शिक्षक* सह इतर प्रमुख मागण्या ... यशस्वी झाल्यास हजारात *पदनिर्मिती तयार* होतात. 

३)   *उच्च  माध्यमिक स्तर -* (M.P.Ed)  किमान ५०० विद्यार्थी व तासिका वाढ झाल्यास येथेही *पदनिर्मिती* होऊ होतात. 

 *परंतु*  वरील ध्येय व उद्दिष्टे पुर्ण करण्यासाठी  अभ्यासपुर्ण मांडणी , सतत पाठपुरावा , सर्व  शा. शि.शिक्षक संघटना यांची एकत्र ताकद  यांची  आवश्यकता आहे , 

*आता साद* ...शारीरिक  शिक्षण  विषय वाचवण्यासाठी.,, वाढविण्यासाठी  ....

मोठ्या संख्येने एकत्र या.  विजयाचे साक्षीदार व्हा असे आव्हान महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे  श्री . संदिप मनोरे सर व श्री.तायप्पा शेंडगे सर यांनी केले आहे.

श्री.राकेश यादव (शारीरिक शिक्षण शिक्षक )- पुणे वार्ताहर समन्वयक


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या