रविंद्र कुवेसकर, प्रतिनिधी
रायगड : दि. ८- माणगांव मध्ये कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस अधिक वाढ दिसून येत असून नागरिकांनी काळजी घेणे महत्वाचे आहे या बाबत आज रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी माणगांव मध्यवर्ती प्रशासकिय भवन येथे प्रांताधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपंचायत मुख्याधिकारी तसेच उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी यांचे सोबत आढावा बैठक घेतल्याची माहीती तहसिलदार प्रियंका आयरे यांच्याकडून प्रस्तुत प्रतिनिधेने घेतली आहे.
तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे रायगड जिल्ह्याची आढावा बैठक घेणार असल्याची माहीती मिळाली आहे. कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा करु नका लोकांमध्ये जनजागृती करा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना कठोरपणे राबविणे गरजेचे आहे. काळजी घ्या, कारण कोरोना प्रादूर्भावाने कोणाचेही नुकसान वा जिवीतहानी होता कामा नये. या साठी स्थानिक नगरपंचायत प्रशासनासह पोलीस आरोग्य यंत्रणांनी काळजी घ्यावी अशा सक्त सूचना दिल्या आहेत.
कोरोना पेशंटला क्वारंटाईन शिक्के मारणे बंद आहे. कण्टेनमेण्ट झोनचे बॅनर संबधित ठिकाणी लावणेही बंद झाले आहे. अनेक पाॅझिटिव्ह रुग्ण सुध्दा क्वारंटाईन कालावधी पूर्ण न करता बाहेर मोकाटपणे फिरत असल्याचे नागरिकांनी निदर्शनात आणुन दिले आहे. कोणत्याही प्रकारचे शिक्के वा या संबधित रुग्णांची माहीती कळत नाही. यावर प्रशासनाने पुन्हा दखल घ्यावी अस जनतेच म्हणने आहे. याबाबत खासदार सुनिल तटकरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचे सांगितले.




0 टिप्पण्या